राज्यात काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या निवडणुकांचा धुरळा उडाला.(people) या निवडणुकीत भाजप पक्ष सर्वात आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर शिंदेंची शिवसेना दुसऱ्या नंबरवर आघाडीवर पाहायला मिळाली. तसेच ठाकरे बंधूंना या निवडणुकीत फारसे यश आलेले नाही. महापालिकेच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकांच्या तोंडावर आता ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मिळाला आहे.

वेंगुर्ला तालुक्यात ठाकरे गटाचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्यासह (people) सुमारे ३०० पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. युवा सेनेचे तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, माजी जिल्हा परिषद सदस्य योगिता परब, माझी शहर प्रमुख अजित राऊळ, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांच्यासहित अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

सावंतवाडी- वेंगुर्ला मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर व शिवसेनेचे(people) जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला आहे. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला वेंगुर्ल्यामध्ये मोठा धक्का बसला आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे शिंदे शिवसेनेची ताकद वाढणार आहे. दरम्यान महापालिका निवडणुकांनंतर आता जनतेचे लक्ष जिल्हा परिषद निवडणुकांवर लागले आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता वाढत आहे.

हेही वाचा :

उद्या Toyota ची Electric SUV लाँच होणार! मिळणार धमाकेदार फीचर्स आणि किंमत फक्त…

झुरळांना संपवण्यासाठी हे पान करेल खूप मदत, पाण्यात टाका स्वयंपाक घरातील हा पदार्थ

कोल्हापुरात भाजपचा कंडका पडणार; शिंदे गट काँग्रेससोबत जाणार?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *