स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पुरस्कार करणारे आणि सतत चर्चेत राहणारे(Controversy ) हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून चर्चेचे केंद्रस्थान गाठले आहे. या वेळी त्यांनी थेट १५ ऑगस्टसारख्या राष्ट्रीय सणाबाबत आणि तिरंग्याऐवजी भगवा झेंडा फडकवावा, असे विधान करून राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.भिडे म्हणाले की, “१५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिन नाही. देशाला खरी स्वराज्य मिळाली नव्हती, ती फक्त सत्तांतराची प्रक्रिया होती. आपण तिरंगा झेंडा फडकवतो, पण तो इंग्रजांनी घालून दिलेल्या प्रणालीचा भाग आहे. भगवा झेंडा हा खऱ्या भारतीय संस्कृतीचा प्रतीक आहे आणि तोच फडकवायला हवा.”

त्यांच्या या वक्तव्यावर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. (Controversy ) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी भिडेंच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. काँग्रेस प्रवक्ते म्हणाले, “१५ ऑगस्ट हा देशाच्या बलिदानाची आठवण करून देणारा पवित्र दिवस आहे. अशा दिवशी वादग्रस्त विधान करून भिडे हे जनतेला चिथावण्याचे काम करत आहेत.”दरम्यान, भिडेंच्या समर्थकांनी मात्र त्यांच्या विधानाचे समर्थन करत म्हटले आहे की, “ते फक्त भारतीय संस्कृती आणि परंपरेचा गौरव करत आहेत. भगवा झेंडा म्हणजे त्याग, शौर्य आणि धर्माचे प्रतीक आहे.”

राज्यसरकारकडून अद्याप या वक्तव्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. (Controversy ) मात्र, सोशल मीडियावर भिडेंच्या विधानावरून तीव्र चर्चा रंगली आहे. काही जण त्यांचे समर्थन करताना दिसत आहेत, तर अनेक जण देशाच्या एकतेला बाधा निर्माण करणारे विधान म्हणून त्यांचा निषेध करत आहेत.

हेही वाचा :

नागरिकांनो HSRP नंबर प्लेट अद्यापही बसवली नाही? तर वेळीच सावध व्हा

लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी योजना बंद होणार

कॅन्सरची सामान्य लक्षणे जी लोक सहसा दुर्लक्ष करतात, जाणून घ्या अन्यथा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *