महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची सूचना पुढे आली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर HSRP हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.(maharashtra)राज्य परिवहन विभागाने यासाठी 15 ऑगस्ट 2025 ही अंतिम मुदत जाहीर केली असून, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.सध्या राज्यात 2.1 कोटींपैकी केवळ 23 लाख वाहनांवरच ही प्लेट बसवण्यात आली आहे. त्यामुळे विभागाने आता अधिक कडक भूमिका घेतली असून, अंतिम तारखेच्या पुढे थेट दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे.

15 ऑगस्ट 2025 नंतर जर वाहनावर HSRP बसवलेली नसेल, तर मोटार वाहन कायद्याच्या कलम 177 अंतर्गत ₹1,000 ते ₹10,000 पर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, ही कारवाई भरारी पथकांमार्फत तात्काळ केली जाणार आहे.(maharashtra)तथापि, जर वाहनधारकाने 15 ऑगस्टपूर्वी अपॉइंटमेंट बुक केलेली असेल, आणि फिटमेंटची तारीख नंतरची असेल, तर त्याला दंड लागणार नाही. त्यामुळे वेळेवर ऑनलाइन बुकिंग करून कायदेशीरतेचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

HSRP Number Plate | HSRP प्लेट कशी बसवाल? :
वेबसाइट: www.bookmyhsrp.com किंवा www.transport.maharashtra.gov.in

तपशील भरा: वाहन क्रमांक, चेसिस, इंजिन नंबर, मोबाईल
RTO निवडा व अपॉइंटमेंट घ्या

पेमेंट:
दुचाकी – ₹531
चारचाकी – ₹745
होम डिलिव्हरीसाठी वेगळा शुल्क: ₹125 दुचाकी, ₹250 चारचाकी
फिटमेंट सेंटरवर अपॉइंटमेंट दिवशी गाडी, RC आणि ओळखपत्र घेऊन जा.

राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाइन बुकिंगसंबंधी तांत्रिक अडचणी, फिटमेंट सेंटरवरील गर्दी, प्लेटची मर्यादित उपलब्धता आणि ग्रामीण भागातील जागरूकतेचा अभाव यामुळे प्रक्रियेचा वेग अपेक्षित राहिलेला नाही. उदाहरणार्थ, नागपूरमध्ये सप्टेंबर 2025 पर्यंतचे स्लॉट आधीच भरलेले आहेत.या पार्श्वभूमीवर सरकारने यापूर्वी तीन वेळा – मार्च, एप्रिल आणि जून 2025 मध्ये मुदतवाढ दिली होती. (maharashtra)मात्र यावेळी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, ही अंतिम संधी आहे.

हेही वाचा :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *