कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : न्यायपालिकेच विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सर्वसामान्यांना परवडणारा न्याय असला पाहिजे आणि तो पक्षकारांच्या दारापर्यंत गेला पाहिजे या न्यायिक तत्त्वांचा परिपाक म्हणजे सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात सुरू झालेले मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच”(Circuit Bench) होय. त्याचे खंडपीठात रूपांतर होण्यात आता काही अडचण दिसत नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात हे सर्किट बेंच होत असल्याचा मला विशेष आनंद आहे असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रविवारी येथे बोलताना केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच च्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने ते बोलत होते. या शानदार समारोहाच्या एलअध्यक्षस्थानी सर्किट बेंचचे प्रशासकीय मुख्य न्यायमूर्ती मकरंद कर्णिक हे होते.

सीपीआर रुग्णालया समोरील ब्रिटिशकालीन वास्तूमध्ये तसेच काही वर्षांपूर्वी जिल्हा न्यायालयासाठी बांधण्यात आलेल्या चार मजली इमारतीमध्ये सर्किट बेंच(Circuit Bench) सोमवार दिनांक 18 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या जुन्या इमारती सर्किट बेंचला साजेल अशा लूक मध्ये केवळ महिन्याभरात परावर्तित केल्या गेलेल्या आहेत. याच वास्तूंमध्ये सुरू होणार असलेल्या सर्किट बेंचचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये, सर्किट बेंचचे न्यायमूर्ती, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष अमोल सावंत, तसेच सहा जिल्ह्यातील वकील संघटनांचे अध्यक्ष, खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी, तसेच उदय सामंत, प्रकाश अबिटकर, हसन मुश्रीफ, शिवेंद्रसिंगराजे भोसले, रितेश राणे, आणि सहा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्याचा जाहीर कार्यक्रम मेरी वेदर ग्राउंड वर संपन्न झाला. या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बनवण्यासाठी तसेच सहा जिल्ह्यातील पक्षकार वकिलांनी गर्दी केली होती. या समारंभाची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्य गीताने झाली. मला मिळालेले अधिकार अधिकार, राज वैभव, मला मिळालेले पद हे उपभोगण्यासाठी नसून सर्वसामान्य जनतेसाठी, गोरगरिबांसाठी, पद दलितांसाठी सेवा करण्याची मिळालेली एक अमूल्य संधी आहे असे राजर्षी शाहू महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर प्रसिद्ध केलेल्या पहिल्या जाहीरनाम्यात म्हटले होते. त्यांच्या विचाराचा प्रभाव माझ्यावर आहे. मला सुद्धा मिळालेले पद हे सर्वसामान्य लोकांची सेवा करण्यासाठी मिळालेली संधी आहे असे मी आजही समजतो.
राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचे प्रतिबिंब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात पडलेले आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या जडणघडणीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा मोठा वाटा आहे. अशा शब्दात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला, सन्मान केला.
सामान्य माणसाला कमी खर्चात आणि जलद न्याय द्यावयाचा असेल तर न्यायपालिकेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे यावर माझा दृढ विश्वास होता आणि म्हणूनच सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच(Circuit Bench) अर्थात खंडपीठ होणे हे नैसर्गिक न्यायाचे ठरेल या विचारानेच मी त्याचा सतत पुरस्कार करत गेलो, खंडपीठ कृती समितीच्या मागणीला समर्थन देत गेलो.
सर्किट बेंच मंजूर झाल्याशिवाय कोल्हापूरला जायचे नाही असे मी ठरवले होते. आणि आज या सहा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेने, पक्षकारांनी पन्नास वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे आणि या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला मिळाले असे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आवर्जून सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरला सुरू झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे संपूर्ण श्रेय सरन्यायाधीश भूषण गवई यांना दिले. त्यांच्या संकल्प आणि दृढनिश्चयाला राज्याचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्य यांनी प्रतिसाद दिला. आणि म्हणूनच हा आजचा ऐतिहासिक सोहळा होत आहे आणि या सोहळ्याला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली आहे. हे सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी इसवी सन 2014 ते इसवी सन 2025 यादरम्यान कोल्हापूरला खंडपीठ होण्याविषयी एक ज्या काही घटना घडल्या त्याचे तारखेसह तपशील सांगितले.
सहा जिल्ह्यांच्या सर्किट बेंचसाठी(Circuit Bench) कोल्हापूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या सर्किट बेंचवर अर्थात खंडपीठावर कोल्हापूरचाच नैतिक अधिकार आहे. सर्किट बेंच, खंडपीठ यासाठी वेळोवेळी लागेल ते सहकार्य करण्याचा मी प्रयत्न केला. न्यायपालिकेच्या प्रमुखांनी आवश्यक त्या मूलभूत सोयी आणि सुविधा देण्याची तयारी आहे का असे मला विचारले तेव्हा मी क्षणाचाही विचार न करता खंडपीठ इमारतीसाठी लागणारी जमीन आणि निधी देण्याची तयारी दाखवली. आणि आज याच कार्यक्रमात खंडपीठ वास्तूसाठी शेंडा पार्क परिसरातील आवश्यक असलेली जमीन न्याय संस्थेकडे हस्तांतरित करतो आहे असे फडणवीस यांनी सांगितले.
कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू होत आहे, सुरू झाले आहे आणि खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचं आज दालन उघडलय. भविष्यकाळात कोल्हापुरात महसूल विभागही होण्याचे संकेत त्यांनी दिले. कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच अर्थात खंडपीठ झाले पाहिजे हा माझा सुद्धा आग्रह होता.

त्यासाठी आवश्यक असलेले मंत्रिमंडळाचे प्रस्ताव उच्च न्यायालयाकडे पाठवले होते, मुख्य न्यायमूर्तींशी बोलणे झाले होते, सर्व प्रकारच्या मूलभूत सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली होती, एवढे सारे होऊनही सर्किट बेंच कोल्हापूरला होईल की नाही याबद्दल मनात कुठेतरी शंका वाटत होती. पण भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आज हे घडते आहे आणि म्हणूनच त्याचा संपूर्ण श्रेय त्यांनाच द्यावे लागेल. असे फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही यावेळी भाषण झाले. इसवी सन 1867 स*** कोल्हापुरात जिल्हा न्यायालयाची स्थापना झाली. 1931 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांच्या संस्थानात म्हणजेच कोल्हापुरात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली.
आज राजश्री शाहू महाराजांच्या , राजाराम महाराजांच्या कोल्हापुरात सर्किट बेंचची स्थापना झाल्यामुळे सामाजिक न्यायाच वर्तुळ पूर्ण झाले आहे. आजचा हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. सहा जिल्ह्यातील पक्षकारांना कमी खर्चात जलद न्याय मिळणार आहे. शासन आपल्या दारी हा आम्ही उपक्रम राबवला होता आणि आता न्याय तुमच्या दारी आला आहे असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
सर्किट बँकेचे(Circuit Bench) प्रशासकीय प्रमुख न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, राज्याचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष अमोल सावंत, यांची भाषणे झाली. समारंभाचे सूत्रसंचालन उमेश सावंत यांनी केले तर महाराष्ट्र बार कौन्सिलचे संग्राम देसाई यांनी प्रास्ताविक केले.
हेही वाचा :
राहुल गांधी यांची बिहार यात्रा आणि निर्वाचन आयोगाचा खुलासा
मध्यरात्री अपघाताचा थरार; मद्यधुंद कारचालकाने ६ जणांना उडवलं
रोजगाराच्या संधी वाढणार; मुख्यमंत्र्यांची आयटी पार्क स्थापन करण्याची घोषणा