कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या वर्षी डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्या. प्रचंड बहुमत प्राप्त करून जानेवारी 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आले. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धुरळा उडवत महाविकास आघाडीने(political) प्रचंड यश मिळवले होते पण अवघ्या काही महिन्यात प्रचंड आणि दारुण पराभव कसा काय झाला या प्रश्नाने हैराण झालेल्या म. वि. आ. च्या नेत्यांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करून मतदारांचा कौल शंकास्पद असल्याचे म्हटले होते. इंडिया आघाडीचे राहुल गांधी यांनीही अशाच प्रकारचा संशय तेव्हा बोलून दाखवला होता.

काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीच्या बैठकीत लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात, कर्नाटकात, बिहारमध्ये मतदार याद्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला आहे, या घोटाळ्याच्या माध्यमातून मत चोरीचा प्रयत्न झाला आहे अशा प्रकारचा गंभीर आरोप करताना त्यांनी स्क्रीनवर प्रेझेंटेशन दिले होते. त्यानंतर ही त्यांनी निर्वाचन आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांना काही प्रश्न विचारले होते आणि या प्रश्नांची उत्तरे आपणाला अपेक्षित आहेत, अभिप्रेत आहेत असे म्हटले होते.
तथापि अगदी सुरुवातीलाच मतचोरीच्या आरोपावरून निर्वाचन आयोगाने राहुल गांधी(political) यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आम्ही त्याबद्दलचे मत किंवा खुलासा व्यक्त करू असे स्पष्ट केले होते मात्र मी संसदेत संविधानाची शपथ घेतलेली आहे त्यामुळे मी प्रतिज्ञापत्र देऊ शकत नाही अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली होती.
रविवारी निर्वाचन आयोगाने पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी केलेले आरोप फेटाळून लावले, आरोप करायचे आणि पुरावे द्यायचे नाहीत, प्रतिज्ञापत्र ही सादर करायचे नाही हा भारतीय संविधानाचा त्यांच्याकडून अपमान केला गेला आहे. आता आम्ही त्यांच्या आरोपाची दखल घेणार नाही आणि त्यांना निर्वाचन आयोग घाबरत ही नाही असे मुख्य आयुक्तांनी पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर तुम्ही निर्वाचन आयोगाची माफी पाहिजे असे असे सुनावले आहे.
आत्तापर्यंत भारतात, राज्यात, जिल्ह्यात, शहरात अनेक निवडणुका झाल्या आहेत. पूर्वी त्या बॅलेट पेपरवर व्हायच्या आणि आता द्या मतदान यंत्राच्या मार्फत घेतल्या जात आहेत. पण निवडणुकीच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्या पूर्णपणे निर्दोष आहेत असे एकदाही घडलेले नाही. मतदार यादी मध्ये घोळ हा प्रकार काही नवीन नाही. खरे तर तो सुधारण्याचा प्रयत्न संबंधित मतदारांनीच पुढे होऊन केला गेला पाहिजे मात्र सर्वसामान्य मतदार अगदीच उदासीन आहे आणि त्यामुळे सदोष मतदार याद्या तयार होतात.

मतदार यादी अद्यावत आणि पूर्णपणे निर्दोष असली पाहिजे यासाठी निवडणूक(political) यंत्रणांनी आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. एकाच घरामध्ये अवाजवी मतदारांची नोंदणी, जिवंत मतदाराला मृत करणे आणि मृत मतदाराला जिवंत करणे, महिला मतदारांच्या नावाच्या सुरुवातीला श्री लावणे आणि पुरुष मतदारांच्या नावाच्या सुरुवातीला श्रीमती लावणे असे प्रकार नेहमीच घडतात. त्यातून मग संशयाला जागा निर्माण होते.
राहुल गांधी यांनी सदोष मतदार याद्या दाखवताना मत चोरीचा केलेला आरोप अगदीच अनाठायी आहे असे म्हणता येणार नाही पण त्यांनी आरोप करताना निर्वाचन आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही. नजीकच्या काळात बिहारमध्ये निवडणुका होत आहेत. आणि तेथील मतदार यादी मध्ये 65 लाख मतदारांची नोंदणी चुकीची झालेली आहे असा गंभीर आरोप करत राहुल गांधी हे बिहारमध्ये मतदारांना जागृत करण्यासाठी यात्रा काढत आहेत आणि त्याचा प्रारंभ ही त्यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनीही निवडणूक काळात माझ्याकडे काही व्यक्ती आल्या होत्या आणि त्यांनी तुमच्या विरोधकांची दहा हजार मते गायब करून दाखवतो असे सांगितले होते असा आरोप त्यांनी नुकताच केला आहे. मात्र असा आरोप करण्यापूर्वी त्यांनी त्याचे काही पुरावे सादर केलेले नाहीत.
मतदान हा सर्वसामान्य जनतेला संविधानाने दिलेला अधिकार आहे. ही मतदान प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडणे हे लोकशाहीसाठी उचित नाही. आणि म्हणूनच मतदार याद्या विषयी संशय व्यक्त होणार नाही असे वातावरण तयार करण्याची जबाबदारी निर्वाचन आयोगावर आहे आणि ती त्यांनी समर्थपणे पार पाडली पाहिजे.
हेही वाचा :
मालकाच्या पैशांवर नोकराचा डाव; चोरी करून SIP, FD मध्ये गुंतवणूक
‘दादा तुमच्यावर प्रेम करतो’ म्हणत विवाहितेने टाकला नवरा, पुढे….
मध्यरात्री अपघाताचा थरार; मद्यधुंद कारचालकाने ६ जणांना उडवलं