सोलापूर आणि परिसरातील तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यात आयटी पार्क (IT Park) उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असून युवकांना मुंबई-पुण्यासारख्या महानगरांकडे नोकरीसाठी स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही.मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी या योजनेबाबत माहिती दिली. जिल्हा प्रशासनाने योग्य जागा निश्चित केली की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आयटी पार्क (IT Park)उभारल्याने स्थानिक युवक-युवतींसाठी हजारो नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल. या पार्कमध्ये विविध आयटी उद्योग, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान आधारित कंपन्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.सोलापूरमध्ये आधीच चांगले रस्ते आणि विमानतळ सेवा उपलब्ध झाल्याने उद्योगांना आवश्यक सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे या परिसरातील औद्योगिक विकासालाही मोठी गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. शहरात बंद जलवाहिनी प्रकल्प सुरू करण्यात आला असून सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पालाही गती देण्यात आली आहे. नागरिकांना शुद्ध पाणी पुरवण्यासाठी 850 कोटींच्या जल वितरण वाहिनी प्रकल्पालाही मान्यता देण्यात आली आहे.याशिवाय, सोलापूर विमानतळाच्या अतिरिक्त कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या सर्व उपक्रमांमुळे सोलापूरच्या विकासाला नवे बळ मिळेल.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या लाभार्थ्यांना घरांचे वितरण केले. या प्रकल्पांतर्गत 1,348 सदनिकांचे वितरण करण्यात आले.पीपीपी मॉडेलवर उभारलेल्या या घरांच्या किंमती परवडणाऱ्या असल्याने सर्वसामान्यांना घर मिळणे सोपे झाले आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून थेट आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे नागरिकांना कमी दरात घरकुल मिळाले आहे.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केवळ सोलापुरमध्येच तब्बल 48 हजार घरांची निर्मिती करण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत 25 हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून 20 हजार घरांचे वितरण झाले आहे. उर्वरित घरांचे काम वेगाने सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेसाठी 1 हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून गरीबांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मदत ठरणार आहे.

हेही वाचा :

मध्यरात्री अपघाताचा थरार; मद्यधुंद कारचालकाने ६ जणांना उडवलं

‘दादा तुमच्यावर प्रेम करतो’ म्हणत विवाहितेने टाकला नवरा, पुढे….

मालकाच्या पैशांवर नोकराचा डाव; चोरी करून SIP, FD मध्ये गुंतवणूक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *