आजकाल हलका असो किंवा जड, मेकअप हा अनेकांच्या दैनंदिन (applying) आयुष्याचा भाग बनला आहे. मात्र रोज मेकअप करताना जर योग्य काळजी घेतली नाही, तर सौंदर्य वाढण्याऐवजी त्वचेलाच मोठा फटका बसू शकतो. तज्ज्ञांच्या मते, काही सवयी दीर्घकाळ टिकल्या तर त्वचेवर अकाली सुरकुत्या, मुरुमे आणि कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका वाढतो.मेकअपचा चुकीचा वापर आणि अस्वच्छ सवयी त्वचेसाठी किती घातक ठरू शकतात, हे स्पष्ट केले आहे. वर्षानुवर्षे सतत होणाऱ्या चुकांमुळे त्वचेची छिद्रे बंद होतात, दाह निर्माण होतो आणि काही वेळा दीर्घकालीन त्वचेचे नुकसानही होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

त्यांच्या मते, महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा सातत्यपूर्ण आणि योग्य (applying) स्किन केअर अधिक महत्त्वाची आहे. अनेकजण चेहरा नीट न धुता थेट मेकअप लावतात किंवा मॉइश्चरायझर न वापरता प्रायमर आणि फाउंडेशनचा वापर करतात. अशा वेळी मेकअपचे कण त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकतात. याचा परिणाम म्हणून ब्लॅकहेड्स, मुरुमे आणि पुरळ यांसारख्या समस्या वाढतात. त्यामुळे मेकअप करण्याआधी चेहरा स्वच्छ करणे, योग्य मॉइश्चरायझर लावणे आणि नंतरच मेकअप करणे आवश्यक आहे.यासोबतच रोज मेकअप करणाऱ्यांकडून आणखी एक मोठी चूक घडते, ती म्हणजे ब्रश आणि स्पंज स्वच्छ न करणे. अस्वच्छ ब्रशमध्ये जंतुसंसर्ग करणारे बॅक्टेरिया वाढतात, जे थेट त्वचेशी संपर्कात येतात. यामुळे खाज, जळजळ, लालसरपणा आणि पिंपल्सची समस्या निर्माण होऊ शकते.

अनेक लोक दररोज जाड थराचं फाउंडेशन वापरतात. (applying) मात्र सतत हेव्ही मेकअप केल्याने त्वचेची छिद्रे बंद होण्याची शक्यता वाढते. यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते आणि लवकर सुरकुत्या पडू शकतात. जर रोज मेकअप करणे आवश्यक असेल, तर हलका मेकअप निवडणे, नियमित सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर वापरणे अधिक फायदेशीर ठरते.सर्वात घातक सवय म्हणजे मेकअप न काढता झोपणे. रात्री मेकअपसह झोपल्याने त्वचेला श्वास घेता येत नाही. परिणामी कोरडेपणा, थकलेली त्वचा, मुरुमे आणि डाग दिसू लागतात. म्हणून झोपण्यापूर्वी मेकअप रिमूव्हरने चेहरा स्वच्छ करणे, नंतर फेसवॉशने धुणे आणि शेवटी मॉइश्चरायझर लावणे अत्यंत आवश्यक आहे.तज्ज्ञांच्या मते, त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी केवळ मेकअपवर अवलंबून राहण्यापेक्षा योग्य सवयी आणि नियमित काळजी घेणं अधिक महत्त्वाचं आहे. लहान चुका वेळेवर सुधारल्या नाहीत, तर कमी वयातच त्वचेवर त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *