कबनूर मुख्य चौकात लावलेल्या आक्षेपार्ह झेंड्याबाबत अखेर तोडगा काढण्यात आला.(objectionable) हा झेंडा काढून संबंधितांनी आपल्या धार्मिकस्थळी विनाआक्षेपार्ह मजकूर असलेला झेंडा लावावा, असा एकमुखी निर्णय प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.या तोडग्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर सकाळपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन तब्बल सात तासांनंतर सायंकाळी मागे घेण्यात आले. परिणामी चार दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला.

कबनूर येथे महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य झाल्यानंतर (objectionable) रविवारी ता.२२ जमावाकडून दगडफेक व रस्ता रोको आंदोलन केले होते. या घटनेत पोलिसांवरही दगडफेक झाल्याने पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.याप्रकरणी ५२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याने गावात तणावाचे वातावरण होते. दरम्यान, मुख्य चौकातील आक्षेपार्ह झेंडा काढण्याच्या मागणीवरून दोन समाजांमध्ये तीव्र मतभेद झाले होते. आज सकाळपासून शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर आक्षेपार्ह झेंडा तत्काळ हटवावा, कबनूर तणावप्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अटकेची कारवाई थांबवावी आदी या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.

अप्पर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी आंदोलकांची समजूत काढत (objectionable) कायदेशीर चौकटीत कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.सायंकाळी प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक झाली. या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंची मते स्वतंत्रपणे ऐकून घेत वस्तुस्थितीचा आढावा घेतला. यानंतर कबनूर मुख्य चौकातील आक्षेपार्ह झेंडा सन्मानाने काढून संबंधितांनी आपल्या धार्मिकस्थळी कोणताही वादग्रस्त मजकूर नसलेला झेंडा लावावा, असा सर्वमान्य तोडगा काढण्यात आला.

या निर्णयाला दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींनी एकमुखी मान्यता दिली. (objectionable) यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले. तसेच पोलिस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले.बैठकीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. परिणामी तणाव निवळून शांततेचे वातावरण निर्माण झाले. बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक जाधव, उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, तानाजी सावंत, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, अप्पर तहसीलदार महेश खिलारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके उपस्थित होते.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *