राज्यातील सत्ताकारणात नवे वळण लागण्याचे संकेत मिळत (new)असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारणार आहेत. मंत्रालयात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी त्या उपमुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारतील, त्यानंतर थेट कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुतांश आमदार व वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने पक्षाकडून एकप्रकारे एकजुटीचे प्रदर्शन होईल, असे मानले जात आहे.दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर रवाना होणार आहेत. उद्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेषत: राज्यातील दोन राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घडामोडी अशा वेळी होत आहेत, जेव्हा नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा (new) परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीला मोठे यश मिळाले आहे. 12 पैकी 11 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीने सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी महत्त्वपूर्ण चर्चा केल्याचे समजते. त्यांच्या दौऱ्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा होत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.राज्यातील मित्रपक्षांमध्ये समन्वय, भविष्यातील राजकीय समीकरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत दिल्लीत खलबते होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. सुनेत्रा पवार यांच्या पहिल्याच दिल्ली दौऱ्यात नेमक्या कोणत्या निर्णयांवर चर्चा होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता जाणवल्यास ‘या’ शाकाहारी पदार्थांचे करा सेवन
अँड्रॉइड फोनमध्ये ताबडतोब बदला ‘ही’ सेटिंग, तुमचा फोन चालेल एकदम फास्ट
स्मृती मंधानाच्या आईने पलाश मुच्छलबाबत केलेली पोस्ट चर्चेत! मग करावी लागली डिलीट