कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
जागतिक पोलीस अशी पूर्वी अमेरिकेची (America)ओळख होती. पण ती दादागिरी या अर्थाने होती. जगाने आम्हालाच सर्वार्थाने महासत्ता म्हणून स्वीकारले पाहिजे. सर्वात बलाढ्य राष्ट्र म्हणून आमचा आदर केला पाहिजे अशा अर्थाने अमेरिकेची जागतिक पोलीस ही ओळख लादली होती. आता आम्ही जगाचे तारणहार आहोत अशा अविर्भावात डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवीनच वादग्रस्त विधान करून जागतिक पातळीवर खळबळ उडवून दिली आहे. वास्तविक त्यांचा हा दावा निराधार आहे, तू जगातील कुठल्याही राष्ट्राप्रमुखाला पटणारा नाही.आणि त्याला भारतही अपवाद नाही.
गेल्याच आठवड्यात डोनाल्ड (America)ट्रम्प यांचा मिजासअमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने उतरवला होता.
जगातील अनेक देशांना लावण्यात आलेले भरमसाठ आयात शुल्क हे बेकायदेशीर असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. न्यायालयाने एक जोरदार चपराक लावूनही ट्रम्प महाशय सुधारलेले आहेत असे म्हणता येणार नाही कारण त्यांनी ज्या दिवशी निर्णय झाला त्याच दिवशी किमान दहा टक्के आयात शुल्क नाकारून ते 15 टक्क्यावर नेऊन”हम नही सुधरेंगे”असा संदेशच त्यांनी दिला होता. आता मात्र त्यांनी एक नवीनच खळबळ घेण्यात विधान करून भारत पाकिस्तान सह जगाला अचंबित करून सोडले आहे.
पहलगाम दशतकांडानंतर (America)भारताने पाकिस्तान विरुद्ध”ऑपरेशन सिंदूर”हे युद्धसदृश्य अभियान चालवले होते. पाकिस्तानी कागाळी केल्यानंतर या चार दिवसांच्या अघोषित युद्धाला तोंड फुटले होते. या युद्धात भारताकडून अणुबॉम्ब पाकिस्तान वर डागला जाणार होता, तसे झाले असते तर पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचा जीव गेला असता आणि पाकिस्तान मधील किमान तीन ते साडेतीन कोटी लोक या अनुयुद्धात मारले गेले असते. मला हा धोका लक्षात येताच मी या युद्धात हस्तक्षेप केला आणि दोन राष्ट्रांमध्ये शस्त्र संधी घडवून आणली. आणि मग जगासमोरील आणि पाकिस्तान समोरील अनुयुद्धाचा धोका टळला. असे वादग्रस्त विधान ट्रम्प महाशयांनी नुकतेच केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अघोषित युद्धामध्ये मध्यस्थी केलेली नव्हती. त्यांच्यामुळे शस्त्र संधी करण्यात आली नव्हती. दोन्ही राष्ट्राच्या लष्कर प्रमुखांनी एकमेकांशी संवाद साधून आणि चर्चा करून ही शस्त्र संधी केली गेली होती. शस्त्र संधीचा प्रस्ताव पाकिस्तान कडूनच आला होता. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच लष्कर प्रमुखांनी यापूर्वी अनेकदा जगाला जाहीरपणे सांगितले आहे. पण तरीही भारत हा पाकिस्तान वर अणु हल्ला करणार, त्यामध्ये पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यासह पाकिस्तानचे साडेतीन कोटी लोक मारले जाणार असा दावा करताना आम्ही जगाचे तारणहार आहोत असे ट्रम्प यांना सूचित करावयाचे आहे असे दिसते.
आपल्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातील”स्टेट ऑफ दि युनियन”च्या तब्बल 100 मिनिटांच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक खळबळ जनक खुलासे केले असले तरी उर्वरित जगाकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली जातेच असे नाही.कोसोव्हा आणि सरबिया, कंबोडिया आणि थायलंड, इस्रायल विरुद्ध इराण, भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील युद्धे केवळ माझ्या मध्यस्थीमुळे थांबली आहेत. ह्या त्यांच्या
म्हणण्यात थोडेफार तथ्य आहे पण जगाला आपण विनाशापासून वाचवत आहोत ही त्यांची दर्पोक्ती आहे.
भारत आणि पाक मधील अघोषित युद्ध हे ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे थांबले नाही तर पाकिस्तान कडून शस्त्र संधीची विनंती केली गेल्यामुळे भारताने हे युद्ध थांबवले असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच लष्कर प्रमुख केंद्र द्विवेदी तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वेळोवेळी केलेला आहे पण ट्रम्प महाशयांना ते मान्य नाही. माझ्यामुळे युद्ध थांबले हे त्यांचे पालुपद सतत चालू असते.
अनेक देशांमध्ये चालू असलेली युद्ध माझ्यामुळे थांबली असे ट्रम्प महाशय सांगतात मात्र त्यांच्याकडूनच सध्या इराणवर हल्ला करण्याची तयारी जोरात सुरू आहे. हा
आणखी मोठ्ठा विरोधाभास आहे. पण त्यांना सांगणार कोण? इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांना दुसऱ्या देशाचा तळ हवा आहे. दुसऱ्या देशाची भूमी हवी आहे. वीरांवर हल्ला करण्यासाठी तुमची भूमी आम्हाला वापरायला द्या अशी विनंती डोनाल्ड ट्रम्प यांनी ” युके” कडे केली होती.मात्र त्यांनी परवानगी दिली नाही. आता इराणवरील हल्ल्यासाठी डिएगो गारशियाचा समुद्र
वापरता येईल का याची चाचणी त्यांच्याकडून सुरू असली तरी अनेक देशांचा त्याला विरोध राहील.
ं