कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
आम्हीही शत्रु प्रांतात आतवर घुसून एअर स्ट्राइक करू शकतो.(strike)दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करू शकतो असा एक संदेश दक्षिण आशिया पर्यंत पोहोचवण्यासाठी पाक ने अपघांच्या पूर्व दिशेवर शुक्रवार शनिवार दरम्यानच्या मध्यरात्री एअर स्ट्राइक केला. इंटेलिजन्स एअर स्ट्राइक असा शब्दप्रयोग पाकिस्तानी यासंदर्भात केलेला आहे. मात्र ही लष्करी मोहीम किती वेळात संपवली हे स्पष्ट केले नाही. भारताने पाकिस्तानवर एयर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ अवघ्या 24 मिनिटात उध्वस्त केले होते. भारताप्रमाणेच आम्ही हेअर स्टाईल करण्यात पटाईत आहोत असे सांगण्याचा पाचचा हा प्रयत्न आहे. लष्करी दृष्ट्या कमकुवत असलेल्या अफगांणवर हेअर स्ट्राइक करून आम्ही ताकतवर असल्याचा पाकचा दावा गांभीर्याने घ्यावा असा नाही.
पाकिस्तान मध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांचे अफगाणच्या पूर्व सीमेवर तळ आहेत. दहशतवाद्यांना तिथे प्रशिक्षण दिले जाते.

तिथून प्रशिक्षित होऊन दहशतवादी हे पाकिस्तान मध्ये येतात आणि (strike) दहशतवादी कारवाया करतात असा पाकिस्तानचा दावा आहे. गेल्याच आठवड्यात इस्लामाबाद मध्ये एका मशिदीत स्फोट झाल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने हा एअर स्ट्राइक केलेला आहे. त्यामध्ये 19 लोक मृत्युमुखी पडले आहेत. मात्र आम्ही हा एअर स्ट्राइक अतिशय नियोजनपूर्वक फक्त आणि फक्त दहशतवाद्यांच्या तळावरच केला आहे असा दावा पाकने केला आहे. पाकिस्तानचा हा एअर स्ट्राइक नागरी वस्तीवर झालेला आहे. धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांवर झालेला आहे. निरापराध लोक मारले गेले आहेत असे अफगाणच्या तालिबानी सरकारने म्हटले आहे. पहलगाम दहशतकांडाच्या आधी भारताने पाकिस्तान मध्ये घुसून एअर स्ट्राइक केला होता. दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते. आणि ही मोहीम केवळ 24 मिनिटात यशस्वी करून भारतीय जवान माघारी परतले होते. तेव्हा याच पाकिस्तानने भारताने केलेल्या हेयर स्ट्राइकमध्ये निराभरात लोक मारले गेले.
हा एअर स्ट्राइक नागरी वस्तीवर केला गेला. लहान मुले मारली गेली असे (strike)मोठ्या आवाजात तेव्हा सांगितले होते. मात्र भारताने केलेला हा एअर स्ट्राइक किती नियोजनपूर्वक केला होता, केवळ आणि केवळ दहशतवाद्यांचे तळच कसे उध्वस्त केले होते याचा एक व्हिडिओच नंतर व्हायरल करून जगाला दाखवला होता. तेव्हा मात्र पाकिस्तानचा मुख भंग झाला होता. याच पाकिस्तानने भारताविरोधी तालिबान्यांचा वापर केला होता. अफगाणमध्ये असलेले रशियन सैन्य हटवण्यात यावे यासाठी अमेरिकेने तेव्हा या वाळवंटी प्रदेशात तालिबान्यांना हाताशी धरून कारवाया केल्या होत्या. नंतर तेथे अमेरिकन फौजा ठेवल्या. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बायोडेन यांनी अमेरिकेचे सैन्य तेथून माघारी घेतल्यानंतर अफगाणमध्ये तालिबानी सरकार अस्तित्वात आले. आता या तालिबानी सरकारचे भारताशी मैत्रीचे संबंध आहेत. जे तालिबानी भारत विरोधात होते तेच आता भारताचे मित्र बनले आहेत. ही तशी पाकिस्तानला चपराक आहे.
अफगाणच्या नांगर हार आणि पक्तिया या दोन ठिकाणी एअर स्टाईल करताना पाकिस्तानने अमेरिकेची लढाऊ विमाने वापरली आहेत. वास्तविक पाकिस्तानला त्यांच्या विरोधात कुठल्या राष्ट्राने हल्ला केला तर ही विमाने वापरण्याची मुभा अमेरिकेने दिलेली असताना त्यांनीही लढाऊ विमाने एअर स्ट्राइक साठी वापरलेली आहेत. हे अमेरिकेशी केलेल्या कराराचे उल्लंघन आहे. आता त्याबद्दल अमेरिका पाकिस्तानला कसा जाब विचारणार हे नजीकच्या काळात दिसेल. वास्तविक लष्करी दृष्ट्या पाकिस्तानच्या तुलनेत अफगाण हा अतिशय कमकुवत आहे. आणि त्यामुळे एका अशक्त देशावर केलेला हा एअर स्ट्राइक आहे असे म्हणता येईल. फार मोठा पाकिस्तानने पराक्रम केला आहे असे कोणीही म्हणणार नाही.
पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पोसणारा देश आहे. प्रामुख्याने पाकिस्तानने दहशतवाद्यांना भारताविरोधी वापरले आहे. आता हेच दहशतवादी पाकिस्तानला त्रासदायक ठरू लागले आहेत. जागतिक स्तरावर पाकिस्तानला फारशी प्रतिष्ठा नाही. हा देश भीके कंगाल बनला आहे. सर्वसामान्य जनतेची उपासमार सुरू आहे. महागाईने कहर केला आहे.कोणताही देश आर्थिक मदत करायला तयार नाही. सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानने केलेला हा एअर स्ट्राइक आहे. पण फार मोठा पराक्रम केला अशी नोंद जगाने त्याची घेतलेली नाही. भारताविरोधी वापरलेल्या दहशतवादी संघटना आता पाकिस्तान वरच उलटलेल्या आहेत.एका अर्थाने हा देश आपल्या कर्माची फळे सध्या भोगताना दिसतो आहे.
हेही वाचा :
नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं
जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या