मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या लेकाच्या लग्नाची तारीख जवळ येत चालली आहे. अर्जुन आणि सानिया चंडोकच्या प्री-वेडिंग फंक्शन्सना सुरूवात झाली आहे. त्यांचा एक सुंदर व्हिडीओही खूप व्हायरल झाला (Sachin Tendulkar)भारताचा दिग्गज क्रिकेटर, माजी खेळाडू सचिन तेंडुलकरच्या घरी लौकरच सनईचे सूर घुमणार आहेत. सचिन-अंजली यांचा लाडका लेक अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचं 5 मार्च रोजी लग्न होणार असून त्याच्या प्री वेडिंग फंक्शनलाही सुरूवात झाली आहे

. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सानिया व अर्जुन यांचा साखरपुडा झाला. आता त्यांच्या लग्नाला अवघे काही दिवसच उरले असून नव्या सुनेला घरी आणण्यासाठी तेंडुलकर परिवार सज्ज आहे. दोघांच्या लग्नापूर्वी काही विधि, कार्यक्रमा पार पडले. त्यासाठीच सचिन तेंडुलकर हा पत्नी अंजलीसह आणि अर्जुन-सानिया अंबानी कुटुंबासोबत प्री-वेडिंगसाठी जामनगरला पोहोचला होता. त्यावेलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरला झाला असून अनेक फोटोही समोर आले आहेत. या फंक्शनदरम्यान अनेकांनी मनोगत व्यक्त केलं, मात्र लाडक्या लेकाच्या लग्नाआधीच सचिन खूप भावूक झाला होता. त्याचं इमोशल भाषणही सगळीकडे व्हायरल झालंय.
तेंडुलकर कुटुंबाने पूजा करून प्री वेडिंग सेलिब्रेशन सुरू केलं, जामनगरमध्ये सगळे एकत्र जमले होते. (Sachin Tendulkar)याच ठिकाणी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचेही काही विधी झाले होते. आता अर्जुन सानियाच्या प्री वेडिंग सेलिब्रिशेनसाठी दोघांचेही संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. सचिन तेंडुलकरने यावेळी अंबानी कुटुंबाचे आभार मानले. “या जोडप्याला त्यांच्या पुढील प्रवासात आशीर्वाद देण्यासाठी आम्ही यापेक्षा चांगले ठिकाण आणि चांगले लोक निवडू शकलो नसतो. आम्हाला येथे आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.” असं तो म्हणाला.
यावेळी सचिनने अर्जुन तेंडुलकर आणि सानियाच्या प्रेमाबद्दलही सांगितले. तो म्हणाला, की जेव्हा मुलगा मुलीला घरी आणतो आणि तिची ओळख करून देतो तेव्हा वडिलांना समजतं की, आपला मुलगा तर आता मोठा झालाय. ते दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेत. अर्जुन मला तुझा अभिमान आहे. तुला अशी खास व्यक्ती सापडली आहे. तुझं तिच्यावर जितंक प्रेम आहे, तिचंही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. सचिनच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अर्जुन आणि सानिया चंडोकचा गेल्या वर्षी, ऑगस्ट 2025 मध्ये साखरपुडा झाला. आता पुढल्या महिन्यात, 5 मार्च रोजी ते मुंबईत लग्न करणार आहेत. सानिया चांडोक ही ग्रॅव्हिस ग्रुपचे चेअरमन रवी घई यांची नात आहे. ती अर्जुनची बहीण साराची जवळची मैत्रीण देखील आहे. सचिनच्या लेकाच्या लग्नाला देशातील तसेच जगभरातील प्रमुख व्यक्ती हजर राहतील, (Sachin Tendulkar)अशी अपेक्षा आहे. तेंडुलकर कुटुंबियांनी नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांनाही लग्नासाठी आमंत्रित केलं.एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील असूनही, सान्या चांडोक प्रसिद्धीपासून दूर राहते. ती मुंबईतील ची पार्टनर आणि संचालक आहे. हे पाळीव प्राण्यांचे स्किनकेअर, ग्रूमिंग आणि त्याच्याशी निगडीत प्रॉडक्ट्स पुरवतात. 2022 साली तिने याची सुरूवात केली होती.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!