कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर (MLA) जिल्हा दूध उत्पादक संघाच्या गोकुळ निवडणुकीचा बिगुल वाजला असून, यासाठीची ठराव संकलन प्रक्रिया नऊ मार्चपासून सुरू होणार आहे. विभागीय उपनिबंधक दुग्ध राजकुमार पाटील यांनी ‘गोकुळ’कडे तालुकानिहाय संस्थांची यादी २ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश आज दिले.पाच वर्षांपूर्वी म्हणजे २ मे २०२१ रोजी ‘गोकुळ’ची निवडणूक झाली होती. पाच वर्षांनंतर विद्यमान संचालकांची मुदत ४ मे २०२६ रोजी संपणार आहे. विद्यमान संचालकांची मुदत संपण्याची तारीखच अर्हता तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. तत्पूर्वी तीन वर्षे अगोदर ‘गोकुळ’च्या सभासद झालेल्या संस्था मतदानासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे ४ मे २०२३ पूर्वी सभासद झालेल्या संस्थांची यादी दोन मार्च रोजी सादर करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक दुग्ध राजकुमार पाटील यांनी ‘गोकुळ’ला दिले आहेत.

‘गोकुळ’कडून सादर झालेली यादी ही संघाची प्रारूप मतदार यादी असेल.(MLA) त्यानुसार तालुकानिहाय संस्थांचे ठराव सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्या कार्यालयात सादर करावे लागणार आहेत. त्यासाठी नऊ मार्चपासून संस्थांना ठराव सादर करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.‘गोकुळ’कडून प्राप्त प्रारूप यादी व संस्थांकडून दाखल ठरावाची छाननी होऊन कच्ची मतदार यादी प्रसिध्द केली जाईल. त्यावर हरकती मागवण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी असेल. या हरकतींवरील सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी निश्‍चित केली जाणार आहे.

अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर एक महिन्यात (MLA)‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. या संदर्भातील कार्यक्रम येत्या एक-दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल.प्रारूप मतदार यादीसह ठराव संकलनाची प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्ह्यात पालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीनंतर आता ‘गोकुळ’च्या राजकारणाचा धुरळा उडणार आहे. पाच वर्षांपूर्वी सर्वच राजकीय नेत्यांनी गठ्ठ्याने ठराव संकलन करून शक्तिप्रदर्शन केले, तीच परिस्थिती यावेळी पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *