कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक गोकुळ संघाचा (election) निवडणूक कार्यक्रम मंगळवारी ता. २४ किंवा बुधवारी ता. २५ जाहीर होऊ शकतो. त्यामुळे ठराव संकलनाला गती येणार आहे.कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर आता गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील राजकारणाचे प्रमुख सत्ता केंद्र असणाऱ्या गोकुळची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढली जाईल, असे गोकुळच्या प्रमुख नेत्यांनी जाहीर केले आहे.

मे २०२६ मध्ये गोकुळच्या विद्यमान संचालकांचा कार्यकाळ संपत आहे,(election) या पार्श्वभूमीवर गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया येणाऱ्या दोन दिवसांत सुरू केली जाणार आहे, तसा प्रस्ताव सहकारमंत्र्यांकडे होता. याला मंजुरी मिळून दोन दिवसांत प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते.मतदानासाठी दूध संस्थांकडे मतदार असणाऱ्या सभासदाचे ठराव मागणी केली जाऊ शकते. त्यामुळे हे ठराव आपल्याकडेच किंवा आपल्या पक्षाकडेच जमा व्हावेत, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांमध्ये मोठी ईर्ष्या रंगणार आहे.

गोकुळमधील विद्यमान आणि माजी संचालकही आपापल्या हक्काचे ठराव संकलन (election) करण्यासाठी आधीपासूनच कामाला लागले आहेत, त्याला अधिक गती मिळणार आहे.निवडणूक प्रक्रिया सुरू व्हावी, यासाठी शासन पातळीवर मोठ्या हालचाली सुरू आहेत. तसेच प्रशासकीय पातळीवरही याबाबतची माहिती घेतली जात असून, निवडणूक प्रक्रिया राबवण्याबाबत सकारात्मकता दर्शवण्यात आलेली आहे.

हेही वाचा :

नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं

जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *