‘मास्टर ब्लास्टर’ Sachin Tendulkar यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच (married) विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. अर्जुनचा विवाह सानिया चंडोकसोबत होणार असून क्रीडा आणि उद्योगविश्वात या शाही सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. समारंभाची सुरुवात 3 मार्च 2026 पासून होणार असून मुख्य विवाहसोहळा 5 मार्च रोजी एका खास आणि गोपनीय ठिकाणी पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अर्जुन आणि सानिया यांची ओळख एका कॉमन (married) फ्रेंडमार्फत झाली होती. ओळखीतून मैत्री, आणि मैत्रीतून अधिक घट्ट झालेले नाते आता विवाहाच्या रूपाने नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. दोघांनीही आपले नाते खासगी ठेवले होते, मात्र लग्नाच्या बातमीने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सानिया चंडोक ही यशस्वी उद्योजिका असून ती Mr Paws Pet Spa & Store या पाळीव प्राण्यांच्या ग्रूमिंग आणि केअर सेवांसाठी ओळखल्या जाणाऱ्या व्यवसायाची संस्थापक आहे. तिने 2020 साली London School of Economics मधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवली आहे. तसेच तिने Worldwide Veterinary Service कडून व्हेटरिनरी टेक्निशियनचा डिप्लोमाही घेतला आहे.

सानिया उद्योगविश्वातील (married) नावाजलेल्या घई कुटुंबाशी संबंधित आहे. तिच्या कुटुंबाचा व्यवसाय फूड आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला आहे. मुंबईतील आलिशान InterContinental Marine Drive या हॉटेलमध्ये त्यांच्या कुटुंबाची मालकी आहे. तसेच आंतरराष्ट्रीय आइसक्रीम ब्रँड Baskin-Robbins भारतात आणण्यात त्यांच्या कुटुंबाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

सानियाचे वडील सनी चंडोक हे मुंबईतील उद्योगपती म्हणून ओळखले जातात. ते Graviss Hospitality Ltd या कंपनीशी संबंधित राहिले आहेत. तिची आई गौरिका घई या देखील याच ग्रुपच्या नेतृत्व टीममध्ये सक्रिय आहेत. आजोबा रवि घई हे Graviss Hospitality Ltd चे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहेत, तर मामा गौरव घई हे Graviss Group चे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने भारतासह मध्य-पूर्व देशांमध्येही विस्तार केला आहे.

सानियाचा भाऊ ईशान चंडोक याचेही नाव उद्योगविश्वात (married) घेतले जाते. अलीकडेच कुटुंबीय व्यावसायिक मालमत्तेच्या नियंत्रणावरून काही कायदेशीर वाद समोर आले होते, ज्यामध्ये सनी चंडोक यांचाही उल्लेख झाला होता. मात्र या सर्व घडामोडींमधून आता अर्जुन आणि सानियाच्या लग्नाची चर्चा अधिक रंगू लागली असून या शाही सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *