मध्य पूर्वेत तणाव दिवसेंदिवस तीव्र होत असून United States आणि Iran यांच्यातील (open war) संघर्ष उघड युद्धात परिवर्तित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने Israel मध्ये तैनात असलेल्या अनावश्यक सरकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तत्काळ देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. इस्राईलमधील अमेरिकन राजदूत Mike Huckabee यांनी दूतावासातील कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये जे कर्मचारी स्वेच्छेने इस्राईल सोडू इच्छितात त्यांनी विलंब न करता तिकिटे बुक करून लवकरात लवकर रवाना व्हावे, असे स्पष्ट केले आहे. संभाव्य तणावामुळे विमान तिकिटांची मागणी अचानक वाढू शकते, त्यामुळे घाई न करता पण उशीरही न करता निर्णय घ्यावा, असा सल्लाही देण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, इराणमधील एका वरिष्ठ धर्मगुरूंनी (open war) अमेरिकेसोबत सुरू असलेल्या चर्चेचे भविष्य अनिश्चित असल्याचे संकेत दिले आहेत. Ali Khamenei यांचे फार्स प्रांतातील प्रतिनिधी लुत्फोल्लाह देझकाम यांनी सांगितले की चर्चा निष्फळ ठरल्यास पुढचा मार्ग संघर्षाचाही असू शकतो. इराण मजबूत भूमिकेतून बोलणी करत असून युद्धाचे गंभीर परिणाम होतील, याची जाणीव दुसऱ्या बाजूला झाल्यासच चर्चेला सकारात्मक दिशा मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या US Department of Stateने प्रवासविषयक इशारा (open war) अद्ययावत केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नॉन-इमर्जन्सी कर्मचाऱ्यांना इस्राईल सोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. जेरुसलेममधील ओल्ड सिटी, वेस्ट बँक आणि गाझा परिसरात प्रवासाबाबत निर्बंध लागू केले जाऊ शकतात, असेही सांगण्यात आले आहे. अमेरिकन नागरिकांना इस्राईल आणि वेस्ट बँकमधील प्रवासाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला देण्यात आला असून गाझात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. लेबनॉन आणि सिरिया सीमेजवळील काही किलोमीटर परिसरात जाणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी आणि निदर्शनांपासून दूर राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दुसरीकडे Chinaनेही (open war) आपल्या नागरिकांना इराण सोडण्याचा सल्ला दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि तेहरानमधील दूतावासाने नागरिकांना सध्या इराणला प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. जे नागरिक आधीच इराणमध्ये आहेत त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगून शक्य तितक्या लवकर कमर्शियल फ्लाइट किंवा स्थलमार्गाने देशाबाहेर पडावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच इराण आणि शेजारील देशांतील चीनी दूतावासांना त्यांच्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एकूणच, मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात असून पुढील काही दिवसांत परिस्थिती कोणते वळण घेते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!