पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणसमोर आणखी एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. इस्त्रायलसोबत तणाव वाढलेला असतानाच इराणमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच तणावाखाली असलेल्या जनतेसाठी ही नैसर्गिक आपत्ती चिंतेची ठरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इराणमधील गिराश परिसरात 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. सुदैवाने या भूकंपात कोणतीही मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. (West Asia) मात्र, सतत सुरू असलेल्या संघर्षामुळे प्रशासन आणि नागरिक अधिक सतर्क झाले आहेत. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, या घडामोडींमध्ये आणखी एक बाब समोर आली आहे. अमेरिकामधील नेवादा अणुचाचणी केंद्र परिसरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. (West Asia) यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही ठिकाणी अणुचाचणीबाबत संशय व्यक्त केला जात असला तरी यासंदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांचा दुहेरी फटका बसत असताना इराणसमोरील (West Asia) परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली आहे. जागतिक पातळीवर या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून पुढील काही दिवस परिस्थिती कशी वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कधी येणार, या तारखेला… सर्वात महत्त्वाची अपडेट समोर!
बागेतलं हे फुल घेतं माणसांचा जीव, कधीच लावू नका हात; अन्यथा होतो अनर्थ!
दुसऱ्याच्या घरी जेवण का करू नये? चाणक्य यांनी सांगितलं कारण