अभिनय क्षेत्रात असे काही कलाकार असतात की ज्यांची लोकप्रियता (popularity) देशांच्या सीमा ओलांडते. पाकिस्तानी मनोरंजनसृष्टी आकाराने लहान असली तरी तेथील काही कलाकारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यापैकीच एक मोठं नाव म्हणजे माहिरा खान. आपल्या सौंदर्य, सहज अभिनय आणि पडद्यावरील प्रभावी उपस्थितीमुळे ती आजही भारतात चर्चेत असते.

पाकिस्तानी मालिकांनी भारतीय प्रेक्षकांमध्ये एक (popularity) वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यात विशेषतः Humsafar या मालिकेमुळे माहिरा खान घराघरात पोहोचली. तिच्या अभिनयातील भावनिक ताकद आणि नैसर्गिक शैलीमुळे प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतले. त्यानंतर Sadqay Tumhare आणि Bin Roye यांसारख्या प्रकल्पांमुळे तिची लोकप्रियता अधिक वाढली.
माहिरा खानने केवळ (popularity) पाकिस्तानपुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही. तिने बॉलिवूडमध्येही पाऊल टाकत मोठी झेप घेतली. 2017 साली प्रदर्शित झालेल्या Raees या चित्रपटात तिने बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Shah Rukh Khan यांच्यासोबत मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली. या चित्रपटामुळे ती भारतीय प्रेक्षकांमध्ये अधिकच लोकप्रिय झाली. तिच्या साधेपणाने आणि अभिनयातील प्रामाणिकपणाने अनेकांची मनं जिंकली.
जरी त्यानंतर तिने भारतीय चित्रपटसृष्टीत फारसं काम केलं नाही, तरी सोशल (popularity) मीडियावर तिची क्रेझ कायम आहे. इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर तिचे लाखो फॉलोअर्स असून ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच व्यावसायिक घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. फॅशन सेन्स, आत्मविश्वास आणि पडद्यावरील नैसर्गिकता यामुळे माहिरा खान आजही दक्षिण आशियातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.
हेही वाचा :
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कधी येणार, या तारखेला… सर्वात महत्त्वाची अपडेट समोर!
बागेतलं हे फुल घेतं माणसांचा जीव, कधीच लावू नका हात; अन्यथा होतो अनर्थ!
दुसऱ्याच्या घरी जेवण का करू नये? चाणक्य यांनी सांगितलं कारण