45 वर्षांचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट, आजही युट्यूबवर करतोय ट्रेंड, कमी बजेटमध्ये केली होती प्रचंड कमाई. रेटिंग देखील जबरदस्त.

1980 चं दशक हे बॉलिवूडचं ‘सुवर्णयुग’ मानलं जातं. या काळात अनेक अभिनेत्यांनी गाजलेल्या चित्रपटांमुळे स्टारडमच्या शिखरावर झेप घेतली. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचाही या दशकात प्रचंड दबदबा होता. (blockbuster) त्यांच्या 1981 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आणि आजही त्यातील गाणी लोकप्रिय आहेत.
‘लावारिस’मधील ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ हे गाणे आजही रसिकांच्या ओठांवर आहे. या गाण्यात अमिताभ बच्चन यांनी महिलांचे वेष परिधान करून केलेला नृत्याने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावलं. विशेष म्हणजे या गाण्यानंतर बिग बींनी अशा प्रकारे स्त्रियांच्या वेशात नृत्य केल्याचे उदाहरण पुन्हा दिसले नाही.
1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत झीनत अमान मुख्य भूमिकेत झळकली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश मेहरा यांनी केले होते. सुमारे 3 तास 9 मिनिटांचा हा चित्रपट त्या काळात प्रचंड हिट ठरला.‘लावारिस’ हा 1981 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी चौथा चित्रपट ठरला होता. अवघ्या 2.75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल 9 कोटी रुपयांची कमाई केली. (blockbuster) त्या काळात ही मोठी कामगिरी मानली जात होती.
या चित्रपटात एकूण सहा गाणी होती आणि ती सर्वच लोकप्रिय ठरली. ‘अपनी तो जैसे तैसे’, ‘कब के बिछड़े हुए’, ‘जिसका कोई नहीं’ आणि ‘काहे पैसे पे’ ही गाणी विशेष गाजली. ‘मेरे अंगने में’च्या स्त्री आवृत्तीला अलका याज्ञिक यांचा आवाज लाभला होता.
आजही ‘लावारिस’ला आयएमडीबीवर 7.0 रेटिंग आहे (blockbuster) आणि हा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध असून अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दमदार कथा, लक्षवेधी अभिनय आणि अजरामर गाणी यामुळे ‘लावारिस’ हा 80च्या दशकातील एक क्लासिक ब्लॉकबस्टर म्हणून आजही स्मरणात आहे
हेही वाचा :
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कधी येणार, या तारखेला… सर्वात महत्त्वाची अपडेट समोर!
बागेतलं हे फुल घेतं माणसांचा जीव, कधीच लावू नका हात; अन्यथा होतो अनर्थ!
दुसऱ्याच्या घरी जेवण का करू नये? चाणक्य यांनी सांगितलं कारण