इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला. पश्चिम आशियात युद्ध भडकले आहे. इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. युद्धासंबंधी आणि देशातील, राज्यांमधील महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या

जळगावातील नशिराबाद येथे महामार्गालगत असलेल्या सावन हॉटेलला भीषण आग लागली. मात्र कामगारांनी हॉटेलमधले 5-6 सिलेंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जळगाव व नशिराबाद येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र हॉटेलमधील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ते सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत.(Israeli attack) गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. शिवतीर्थ निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून वर्धापन दिनासंदर्भात ही बैठक असल्याचं समजतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. छत्रपती संभाजी नगर मध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी वाढली. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार, पेट्रोल डिझेल बंद होणार अशा अफवा पसरल्याने पेट्रोल – डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.
पार्थ पवार हे राज्यसभेसाठी उद्या अर्ज भरणार आहेत. . तर मविआकडून शरद पवार यांचाही उद्या उमेदवारी अर्ज भरला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.पुणे जिल्ह्यातील दुबईत अडकलेल्या सर्व लोकांची माहिती राज्य सरकारकडून संकलित करण्यात आली आहे. युएई गव्हर्नमेंट केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या समन्वय करून भारतात परतण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून कालच्या फ्लाईटमधून विद्यार्थी आणि मुंबईतील काही नागरिक भारतात परतले.
जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध आखाती देशात युद्ध सुरू असल्याने पेट्रोल मिळणार नसल्याची अफवा परभणी जिल्ह्यात पसरली होती. अफवा पसरल्याने वाहन धारकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली होती. बाटली, कॅनमधून वाहनधारक पेट्रोलचा साठा करत होते. टीव्ही 9 च्या बातमीनंतर पेट्रोल पंपावरील गर्दी कमी झाली. जिल्हधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बाटली, कॅनमध्ये पेट्रोल, डिझेल देणं बंद झालं. जिल्ह्यात पेट्रोलचा पुरेसा साठा असून आज सगळे पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत.
इराणने युएईमधल्या अमेरिकन दूतावासावर हल्ला केला असून दूतावासाच्या आत एका मोठ्या स्फोटामुळे आग लागली आहे. अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर बॉम्बहल्ला आजही सुरू आहे. तेहरानमधील आयआरजीसी तळांवर हल्ले करण्यात आले आहेत.
अमेरिका-इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम जळगाव जिल्ह्यातील केळींवर देखील झाला आहे. युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातले 100 पेक्षा अधिक केळीचे कंटेनर हे जीएनटीपी या ठिकाणी अडकलेले आहेत. रमजान महिन्यांमध्ये तब्बल दररोज 10 ते 12 कंटेनर केळी आखाती देशांमध्ये निर्यात होत असतात. .(Israeli attack) मात्र युद्धामुळे निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. या महिन्यांमध्ये केळीला अडीच हजार रुपयांपर्यंत दर मिळत होता, मात्र युद्धामुळे दर घसरले असून केवळ हजार ते पंधराशे रुपये पर्यंत आता दर मिळत आहे. निर्यात ठप्प झाल्याबरोबरच दुसरीकडे केळीचे दर देखील घसरल्याने केळी उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागतोय.
पुणे जिल्ह्यातील दुबईत अडकलेल्या सर्व लोकांची माहिती राज्य सरकारकडून संकलित करण्यात आली आहे. युएई गव्हर्नमेंट, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा समन्वय करून भारतात परतण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत .(Israeli attack) कालच्या फ्लाइटमध्ये विद्यार्थी आणि मुंबईतील काही नागरिक भारतात परतले आहेत. नेमक्या भारतीय प्रवाशांची माहिती होण्यासाठी वेगवेगळ्या टुरिस्ट कंपन्याकडून डेटा गोळा करण्यात आला आहे.
पुण्यातील 50 प्रवासी दुबईमधून परतले असून अडकलेल्या इतर प्रवाशांनाही लवकरात लवकर आणलं जाणार आहे. इस्रायल- इराण- अमेरिका युद्धामुळे दुबईत अनेक प्रवासी अडकले आहेत. पुणे महापालिकेकडून मदत कक्ष सुरू करण्यात आलंय. आतापर्यंत 170 जणांनी संपर्क केल्याची माहिती आहे. महापालिकेकडून गोळा झालेली माहिती जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार देण्यात आली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी महापालिकेत मदत कक्ष उभा करून नागरिकांनी घाबरून न जाता संपर्क करण्याचा आवहान केलंय.
हेही वाचा :
स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट
‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत