इस्त्रायल अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे फक्त त्यांचे देश नव्हे तर अख्खं जग टेन्शनमध्ये आलं आहे.(Gold and silver) या तणावाचा , संघर्षाचा परिणा सोन्या-चांदीवर देखील होत असून दोन्ही धातूंच्य किंमतीत सर्रकन वाढ झाली आहे. 4 मार्च रोजी, सकाळी सोन्याचे भाव किती, घेऊया जाणून.

इस्त्रायल अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याने इराणने त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवलाय. सध्या जगात युद्धाचे ढग असून सगळीकडे अशांततेचं वातावरण पहायला मिळत आहे, याचाच परिणाम बाजारावरही दिसत असून सोन्या-चांदीच्या किंमतीनी थेट वरची पायरी पकडली आहे. आज सोनं आणि चांदीच्या किमती वाढल्या.(Gold and silver) स्थानिक बाजारात सोने आणि चांदी दोन्ही मजबूत पातळीवर व्यवहार करत आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या किमती 1.1 टक्क्यांनी वाढून प्रति 10 ग्रॅमसाठी 1,63,510रुपये भाव झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलोसाठी 2,67,690 रुपये झाले आहेत. जागतिक पातळीवरच्या तेजीचे भारतीय बाजारावर स्पष्ट परिणाम होत असून सुरक्षित आश्रयस्थान म्हणून गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळत आहेत.
24 कॅरेट सोन्याचा भाव 1870 रुपयांनी वाढून 1,63, 510 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. एका ग्रॅम सोन्यासाठी 16 हजार 351 रुपये मोजावे लागतील. एका किलोग्रॅम सोन्याचा भाव 1, 63,51,000 रुपये आहे. चांदी 999 ची किंमत प्रति किलोग्रॅम 2,67,690 रुपये आहे. एक ग्रॅम चांदी सध्या 268 रुपयांना मिळते आहे, तर 10 ग्रॅम चांदीची किंमत 2677 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदी 26, 769 रुपये आहे. जागतिक स्तरावरील तेजीचे प्रतिबिंब चांदीच्या किमतींवर स्पष्टपणे दिसून येत आहे.
सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात 1.16 टक्के वाढ झाली आहे. तर आठवड्याभरात सोनं 1.21 टक्क्यांनी वाढलंय. एकाच महिन्यात सोन्याच्या किमतीत 14.22 टक्के वाढ झाली आहे. (Gold and silver) गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत तब्बल 89.47 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. चांदीने एकाच वर्षात 177.95 टक्के इतका चांगला परतावा दिला आहे.
एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 62,960 रुपये आहे. चांदीचा भाव प्रति किलो 2,67,500 रुपये आहे. यूएस कॉमेक्स एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रति औंस 5174.90 डॉलर्स आहे, तर चांदीचा भाव प्रति औंस 84.52 डॉलर्स इतका आहे
हेही वाचा :
स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट
‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत