कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

‌बंद पडलेल्या शाहू छत्रपती मिल्स (Memorial)च्या जागेवर राजर्षी शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय स्मारक उभा करण्याचा निर्णय होऊन जवळपास बारा वर्षांचा कालावधी लोटून गेला आहे, मात्र हे स्मारक करण्याच्या हालचाली अद्याप सुरू झालेल्या नाहीत. स्मारकाची योजना राज्य शासनाने अडगळीत टाकलेली दिसते किंवा या योजनेची फाईल कायमसाठी बंद करण्याचा निर्णय शासन पातळीवर घेतलेला आहे असे दिसते. या मिलचा परिसर 27 एकरचा असून या जागेवर जिल्ह्यातील काही मातब्बर नेत्यांचा डोळा आहे.

या जागेत वस्त्र महाविद्यालय व (Memorial)तत्सम शिक्षण संस्था सुरू करण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. संस्थांमध्ये युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने राजर्षी शाहू महाराज यांनी 27 एकर जागेत कापड गिरणी चालू केली. कर्जरोखे विक्रीस काढून या कापड गिरणी साठी भाग भांडवल गोळा केले होते. 1990 च्या आसपास खुली अर्थव्यवस्था आल्यानंतर महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग अडचणीत आला. अनेक सूत गिरण्या बंद पडल्या किंवा त्यांचे आर्थिक व्यवस्थापन कोलमडले. त्यामुळे महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाने त्यांच्या काही सूतगिरण्या कापड गिरण्या बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये शाहू छत्रपती मिल्स चा समावेश होता. ही मिल बंद पडल्यानंतर या 27एकर परिसर असलेल्या जागेचे काय करायचे अशी प्रश्नांकित चर्चा सुरू झाली. त्याच वेळेला या जागेवर राजर्षी शाहू छत्रपती यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय स्मारक उभा करण्यात यावे अशी मागणी सुरू झाली.

पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Memorial)होते. त्यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राजर्षी शाहू महाराजांच्या भव्य स्मारकाची घोषणा केली. राज्य शासनाने एका अभ्यास समितीची स्थापना केली होती. हे स्मारक कसे असावे याचा अहवाल तयार झाला. या स्मारकाची एक चित्रकृतीही तयार करण्यात आली होती. हे स्मारक उभा करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले होते. स्मारकाची घोषणा झाल्यानंतर सुरुवातीच्या काही महिन्यात काही हालचाली झाल्या. तथापि वस्त्रोद्योग महामंडळाने ही जागा नोडल एजन्सी असलेल्या महापालिकेकडे वर्ग केली नाही.

एकूणच स्मारकाची योजना (Memorial)कागदावरच राहिली. आठ दिवसापूर्वी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते राजर्षी शाहू जन्मस्थळ लोकार्पण करण्यात आले. वास्तविक या कार्यक्रमात त्यांच्याकडून राजर्षी शाहू महाराज स्मारकाच्या संदर्भात काहीतरी बोलले जाईल असे वाटत होते. मात्र स्मारकाच्या संदर्भात चर्चा झाली नाही. कोल्हापूर शहराच्या प्राईम लोकेशन मध्ये असलेली शाहू मिलची 27 एकर जागा अनेकांच्या नजरेत आहे. ही जागा आपणाला मिळावी यासाठी लँड माफिया प्रयत्नात आहेत. काही राजकीय नेत्यांना त्यांच्या शिक्षण संस्थेसाठी ही जागा हवी आहे. त्यासाठी वस्त्र महाविद्यालय व तत्सम प्रशिक्षण संस्था या जागेत चालू करता येईल असे विचार पुढे येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राष्ट्रीय स्मारकाची घोषणा इसवी सन 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

मात्र हे स्मारक तातडीने व्हावे (Memorial)यासाठी कोल्हापूर उत्तर चे तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही लोकप्रतिनिधीने या स्मारकासाठी आवाज उठवलेला आहे असे घडलेले नाही. ही मोक्याची 27 एकर जागा कोणाच्या घशात जाऊ नये यासाठी आता एक कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने शाहू मिलच्या जागेत पुन्हा कापड निर्मिती उद्योग सुरू करण्यात यावा अर्थात बंद पडलेल्या शाहू मिलचे पुनरुज्जीवन करण्यात यावे अशी मागणी केली आहे. कृती समितीने केलेली ही मागणी योग्य आहे. ठरल्याप्रमाणे स्मारक होणार नसेल तर पुन्हा मिल उभारण्यात यावी याबद्दल सर्वसामान्य शाहूप्रेमींचे दुमत असण्याचे कारण नाही.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Memorial)यांनी शाहू मिलच्या जागेत छत्रपती शाहू महाराज यांचे भव्य स्मारक केले जाणार आहे किंवा नाही याबद्दलची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. वास्तविक या जागेत राजर्षी शाहू महाराजांचे स्मारकच करण्यात आले तर ते एक पर्यटन केंद्र होईल. यास मार्गाकडे मोठ्या संख्येने पर्यटक येथील आणि राजर्षी शाहू महाराजांचा विचार घेऊन जातील. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात जे काही लोककल्याणकारी कार्य केले त्याची विस्तृत माहिती या स्मारकाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मिळाली जावी हा या स्मारकामागचा मुख्य हेतू आहे. एक तर त्या ठिकाणी भव्य स्मारक व्हावे किंवा छत्रपती शाहू मिलची पुन्हा उभारणी करावी. कोणत्याही स्थितीत कुठल्याही नेत्याच्या घशात ही 27 एकर जागा जाता कामा नये ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *