कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकूनही थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. काहीजण या चित्रपटाच्या कथेचं कौतुक करत आहेत, तर काहीजण त्यावर टीका करत आहेत. अशातच या चित्रपटातील एक सीन पाहून प्रेक्षक प्रचंड भावूक झाले आहेत.

विपुल शाह निर्मित आणि कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट 28 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्याच्या काही दिवसांनीच 3 मार्च रोजी मद्रास उच्च न्यायालयाने इंटरनेट सेवा प्रदान करणाऱ्यांना आणि केबल टेलिव्हिजन ऑपरेटर्सना या चित्रपटाचं बेकायदेशीरपणे प्रसारण करण्यास मनाई केली. (‘The Kerala Story 2’) अशातच ज्या प्रेक्षकांन हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला, त्यांनी त्यातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा सीन सध्या तुफान चर्चेत आहे. जवळपास चार मिनिटांच्या या सीनबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. या सीनमधील डायलॉग इतके विचित्र आहेत की नेटकऱ्यांनाही त्यावर प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरला नाही.

या क्लिपमध्ये दाखवण्यात आलं आहे की कशाप्रकारे एका मुलीला जाळ्यात अडकवून आणलं जातं. तिथे जातीच्या नावावर मुलींच्या रेटची (किंमत) चर्चा होते आणि (‘The Kerala Story 2’) त्यानंतर त्या मुलीसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जातात. हे दृश्य पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. ‘मला क्षणभर असं वाटलं की कोणीतरी तिला वाचवेल, परंतु सत्याने माझ्या तोंडावर चपराक लगावली’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे पाहणं खूप वेदनादायी आहे. कृपया तुमच्या मुलींना हा चित्रपट दाखवा’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

विरोध आणि वादानंतरही ‘द केरळ स्टोरी 2’च्या कमाईची सुरुवात समाधानकारक झाली. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने सोमवारी 4 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने भारतात 16.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 19.75 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

केरळ उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगितीचे आदेश दिले होते. त्यानंतर चित्रपटाच्या टीमने दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पुन्हा अपील केलं. रात्री उशिरापर्यंत झालेल्या या सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. (‘The Kerala Story 2’) त्यामुळे शुक्रवारी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल की नाही, हे स्पष्ट झालं नव्हतं. यामुळे शुक्रवारी सकाळी काही ठिकाणी चित्रपटाच्या तिकिटांची विक्री झाली नाही. 2023 मध्येही ‘द केरळ स्टोरी’च्या प्रदर्शनापूर्वी अशाच प्रकारे वाद झाला होता. परंतु अदा शर्माच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 8 कोटी रुपये कमावले होते.

हेही वाचा :

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा यांच्या उदयपूरमधील लग्नाच्या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे किती? किंमत ऐकून…

स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट

‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *