आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता भारताच्या सागरी व्यापारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. या संघर्षामुळे महत्त्वाच्या समुद्री व्यापार मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाले (countries) असून त्याचा थेट फटका भारताच्या निर्यात व्यापाराला बसत आहे. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरत आहे.

मुंबईतील येथे भारतीय कृषी उत्पादनांचे हजारो कंटेनर अडकून पडल्याचे समोर आले आहे. जहाजांची हालचाल मंदावल्याने आणि काही शिपिंग कंपन्यांनी माल पाठवण्यास नकार दिल्याने निर्यातीची प्रक्रिया ठप्प झाली आहे. (countries) परिणामी, निर्यातीसाठी तयार ठेवलेला मोठ्या प्रमाणातील माल बंदरातच थांबलेला आहे.
या अडकलेल्या मालामध्ये जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील केळीचे सुमारे १२०० कंटेनर तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षांचे जवळपास १००० कंटेनर असल्याची माहिती मिळत आहे. द्राक्षे आणि केळी ही नाशवंत फळे असल्यामुळे त्यांच्या साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. (countries) वेळेत निर्यात न झाल्यास शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय भारताचा जवळपास दोन लाख टन बासमती तांदूळही विविध बंदरांवर अडकून पडल्याची स्थिती आहे. या तांदळापैकी सुमारे ८० टक्के निर्यात आखाती देशांकडे केली जाते. मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शिपिंग सेवा विस्कळीत झाली आहे. काही कंपन्यांनी माल पाठवण्यास नकार दिला असून काही कंपन्यांनी आपत्कालीन अधिभार लागू केला आहे. त्यामुळे आयात-निर्यातीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील फळ उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार मोठ्या चिंतेत आहेत. निर्यातीचा मार्ग सुरळीत झाला नाही तर केवळ व्यापारालाच नव्हे तर शेती अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
स्त्रीच्या ‘या’ अवयवाला चुकूनही स्पर्श करू नका, अन्यथा पश्चातापाची येईल वेळ
कानाची काळजी कशी घ्यावी? या चुकांमुळे येऊ शकतो बहिरेपणा