घरातील विजेचा वापर कमी करणे ही आजच्या काळातील महत्त्वाची (consumption) गरज बनली आहे. अनेकदा आपल्याला कळतही नाही आणि काही छोट्या सवयींमुळे वीजेचा अनावश्यक अपव्यय होत राहतो. मात्र काही सोप्या सवयी अंगीकारल्या तर वीजबिल कमी येण्यास मोठी मदत होऊ शकते. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी काही उपकरणांकडे लक्ष दिल्यास विजेची बचत तर होतेच, पण पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागतो.घरांमध्ये बहुतेक वेळा वाय-फाय राउटर रात्रभर चालू ठेवला जातो. परंतु जर रात्री इंटरनेट वापरण्याची गरज नसेल तर राउटर बंद करणे अधिक फायदेशीर ठरते. राउटर वापरात नसतानाही तो सतत वीज वापरत असतो. त्यामुळे तो बंद केल्यास वीज वाचते आणि डिव्हाइसचे आयुष्यही वाढण्यास मदत होते.

याचप्रमाणे अनेक घरांमध्ये टीव्ही आणि सेट-टॉप बॉक्स पूर्णपणे बंद (consumption) करण्याऐवजी स्टँडबाय मोडमध्ये ठेवले जातात. स्टँडबाय मोडमध्ये उपकरणे दिसायला बंद असली तरी त्यामध्ये काही प्रमाणात वीजेचा वापर सुरूच असतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी टीव्ही आणि सेट-टॉप बॉक्स पूर्णपणे बंद करणे ही सवय लावणे फायदेशीर ठरू शकते.मोबाईल चार्जिंगच्या बाबतीतही अनेकदा निष्काळजीपणा केला जातो. फोन पूर्ण चार्ज झाल्यानंतरही चार्जर प्लगमध्येच राहतो. यामुळे थोड्याफार प्रमाणात वीज खर्च होत राहते. त्यामुळे मोबाईल चार्ज झाल्यानंतर चार्जर प्लगमधून काढून ठेवणे अधिक योग्य मानले जाते. यामुळे वीज बचत होते आणि फोनच्या बॅटरीचे आयुष्य टिकून राहण्यासही मदत मिळते.

तसेच काम पूर्ण झाल्यानंतर लॅपटॉप किंवा डेस्कटॉप फक्त (consumption) स्क्रीन बंद करून ठेवण्याऐवजी पूर्णपणे शटडाउन करणे आवश्यक आहे. चार्जर प्लगमध्ये जोडलेला राहिला तरी त्यामधून काही प्रमाणात वीज वापर सुरू राहतो. त्यामुळे वापर संपल्यानंतर चार्जर देखील अनप्लग करणे योग्य ठरते.अशा छोट्या पण महत्त्वाच्या सवयी दैनंदिन जीवनात अंगीकारल्या तर घरातील विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय टाळता येऊ शकतो. यामुळे वीजबिल कमी येण्यास मदत होते आणि ऊर्जा बचतीमुळे पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागतो.

हेही वाचा :

Bluetooth आणि Wi-Fi सुरू ठेवल्याने खरंच बॅटरी संपते का? तज्ज्ञ म्हणतात

तुमच्या मुलांचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करू नका नाहीतर

शरीरात प्रोटीनची कमी? दररोजच्या आहारात करा या कडधान्याचा समावेश

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *