सापांबद्दल समाजात अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. त्यामुळे (misconceptions) अनेकदा साप दिसला की लोक घाबरून त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात भारतात सापांच्या हजारो प्रजाती आढळतात, मात्र त्यापैकी फार थोड्याच विषारी आहेत. साधारणपणे सापांचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते – विषारी, निमविषारी आणि बिनविषारी. यामध्ये बिनविषारी सापांची संख्या सर्वाधिक असून विषारी आणि निमविषारी साप तुलनेने कमी आहेत.

महाराष्ट्रात प्रामुख्याने (misconceptions) चार प्रमुख विषारी साप आढळतात. त्यामध्ये मण्यार, फुरसे, नाग आणि घोणस या सापांचा समावेश होतो. यापैकी नाग हा साप ओळखायला तुलनेने सोपा मानला जातो. कारण धोका जाणवला की तो फणा काढतो, त्यामुळे लोकांना तो पटकन ओळखता येतो. मात्र साप कोणताही असो, त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते. अशा वेळी सर्पमित्रांना माहिती दिल्यास ते सापाला सुरक्षितपणे पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडतात.

सापांबद्दल आणखी एक धक्कादायक पण सत्य माहिती समोर आली (misconceptions) आहे. काही सापांच्या प्रजाती अशा आहेत की त्या मृत्यूनंतरही माणसाला चावू शकतात. ही गोष्ट अनेकांना अविश्वसनीय वाटते, परंतु काही घटनांमधून हे वास्तव समोर आले आहे. एका वृत्तानुसार आसाममध्ये अशी घटना घडली होती. साप मृत झाल्यानंतरही त्याने एका व्यक्तीला चावा घेतला होता. त्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यानंतर सहा दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला.
तज्ज्ञांच्या मते नाग, घोणस आणि ब्राऊन स्नेक्स या प्रजातींमध्ये मृत्यूनंतरही चावा घेण्याची शक्यता असते. नाग आणि घोणस हे भारतात, विशेषतः महाराष्ट्रातही आढळतात, तर ब्राऊन स्नेक्स ही प्रजाती प्रामुख्याने ऑस्ट्रेलियामध्ये आढळते.

यामागे वैज्ञानिक (misconceptions) कारणही आहे. विषारी सापांच्या शरीरात विषग्रंथी असतात ज्यामध्ये विष साठवलेले असते. साप मेला तरी त्याची मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीम काही वेळ पूर्णपणे बंद होत नाही. त्यामुळे सापाचे शरीर लगेच निष्क्रिय होत नाही, तर त्याचे अवयव हळूहळू काम करणे थांबवतात. या दरम्यान जर एखाद्याने सापाला स्पर्श केला किंवा हाताळण्याचा प्रयत्न केला, तर प्रतिक्षिप्त क्रियेने साप चावू शकतो.
म्हणूनच साप जिवंत असो किंवा मृत दिसत असला तरी त्याला हात लावणे टाळावे, असे तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने साप दिसल्यास त्वरित सर्पमित्र किंवा वनविभागाला कळवणे हेच सर्वात योग्य पाऊल ठरते.

हेही वाचा :

Bluetooth आणि Wi-Fi सुरू ठेवल्याने खरंच बॅटरी संपते का? तज्ज्ञ म्हणतात

तुमच्या मुलांचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करू नका नाहीतर

शरीरात प्रोटीनची कमी? दररोजच्या आहारात करा या कडधान्याचा समावेश

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *