Hormuz Strait मधील तणाव आणि Tehran, Jerusalem तसेच Tel Aviv या शहरांवर (escalated) झालेल्या हल्ल्यांमुळे Israel, Iran आणि United States यांच्यातील युद्ध अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. संघर्षाच्या सहाव्या दिवशीही दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच असून परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. इस्रायलने गुरुवारी तेहरानमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ले केले, तर इराणने जेरुसलेम आणि तेल अवीव या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. या संघर्षात आतापर्यंत इराणमध्ये किमान 1230 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच Lebanon मध्ये 70 जण तर इस्रायलमध्ये 12 ते 15 जण ठार झाले आहेत.

या युद्धादरम्यान 28 फेब्रुवारी रोजी (escalated) इराणचे सर्वोच्च नेते Ali Khamenei यांचा मृत्यू झाल्याने परिस्थिती आणखी अस्थिर झाली आहे. युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा तेलपुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला आहे. या मार्गाने जगातील सुमारे 20 टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. भारतासाठीही हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण Saudi Arabia, United Arab Emirates, Qatar आणि Kuwait यांसारख्या देशांकडून येणारे तेल आणि गॅस प्रामुख्याने याच मार्गाने भारतात पोहोचतात.
या पार्श्वभूमीवर India पर्यायी मार्गाने आणि इतर देशांकडून तेल खरेदी (escalated) करण्यासाठी चर्चा करत असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. देशात सध्या पुरेसा साठा असल्याचे सांगण्यात येत असले तरी युद्ध लांबले तर परिस्थिती आव्हानात्मक होऊ शकते. भारताने संभाव्य जागतिक संकटांचा सामना करण्यासाठी धोरणात्मक पद्धतीने भूमिगत तेल साठे तयार केले आहेत. हे साठे मुख्यतः Visakhapatnam, Mangaluru आणि Padur येथे आहेत. या ठिकाणी एकूण सुमारे 5.33 दशलक्ष मेट्रिक टन कच्च्या तेलाचा साठा ठेवण्याची क्षमता आहे, जो देशाच्या जवळपास 10 दिवसांच्या गरजा भागवू शकतो.
केंद्रीय (escalated) पेट्रोलियम मंत्री Hardeep Singh Puri यांनी फेब्रुवारीमध्ये सांगितले होते की भारताकडे एकूण 74 दिवसांचा तेल साठा उपलब्ध आहे. यात धोरणात्मक साठे, रिफायनरीमधील साठा आणि बंदरांवर असलेले कच्चे तेल यांचा समावेश आहे. ‘मिशन समुद्र मंथन’ या उपक्रमांतर्गत हा साठा 90 दिवसांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.तज्ज्ञांच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनीतून दररोज सुमारे 15 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होते. या मार्गावर अडथळा निर्माण झाल्यास जागतिक पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. काही प्रमाणात तेल पाइपलाइनमार्गे वाहतूक होत असली तरी ही सामुद्रधुनी बंद झाल्यास दररोज सुमारे 1 कोटी बॅरल तेलाचा प्रवाह थांबण्याची शक्यता आहे.
या संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारातही दिसू लागला (escalated) आहे. ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 83 डॉलरपर्यंत पोहोचली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मार्च-एप्रिल 2022 पासून देशात पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ झालेली नाही. 21 मे 2022 रोजी सरकारने उत्पादन शुल्क 7 रुपयांनी कमी केले होते आणि 14 मार्च 2024 रोजी आणखी 2 रुपयांची कपात करण्यात आली. सध्या देशात पेट्रोलचा दर सुमारे 94.77 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 87.67 रुपये प्रति लिटर आहे.
भारतात दररोज (escalated) सरासरी जवळपास 50 लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात होते. त्यापैकी सुमारे 25 ते 27 लाख बॅरल तेल होर्मुझ मार्गे येते. जर मध्यपूर्वेकडून होणारा पुरवठा दीर्घकाळ विस्कळीत राहिला, तर तेलाच्या किंमती आणि आयात खर्च दोन्ही वाढू शकतात. वाहतूक खर्च वाढण्याबरोबरच पर्यायी मार्गांवरही मोठा ताण येण्याची शक्यता आहे.या परिस्थितीत Australia आणि Canada यांनी भारताला तेल विक्रीचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था आणि OPEC या तेल उत्पादक देशांच्या संघटनेशीही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनी (escalated) परिसरातील तणावामुळे सुमारे 39 भारतीय मालवाहतूक जहाजे आणि जवळपास 23 हजार खलाशी Persian Gulf, Gulf of Oman आणि लगतच्या समुद्री भागात अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून ऊर्जा पुरवठ्याच्या परिस्थितीवर दिवसातून दोन वेळा आढावा घेतला जात असून सध्या देशात एलपीजी, एलएनजी आणि कच्च्या तेलाचा तुटवडा नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र युद्ध लांबल्यास जागतिक ऊर्जा बाजारात मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा :
Bluetooth आणि Wi-Fi सुरू ठेवल्याने खरंच बॅटरी संपते का? तज्ज्ञ म्हणतात
तुमच्या मुलांचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करू नका नाहीतर
शरीरात प्रोटीनची कमी? दररोजच्या आहारात करा या कडधान्याचा समावेश