शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. बहुतांश क्षेत्रातील शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला आणि बाजारात नकारात्मक वातावरण होते. मात्र या घसरणीतही दोन दारू कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला. बाजारात विक्रीचे सत्र असतानाही या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली आणि दिवसभरात सुमारे 7 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली.

मद्यनिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या असलेल्या युनायटेड ब्रिवेरीज आणि युनायटेड स्प्रिट्स लिमिटेडयांच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त उसळी दिसून आली. (stock market) बाजारातील नकारात्मक वातावरणातही या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स वेगाने धावले. विशेषतः इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदारांना या तेजीचा चांगला फायदा मिळाला.
या तेजीमागे कर्नाटक सरकारच्या नव्या धोरणाचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. कर्नाटक सरकारने दारूविक्रीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता सरकार दारूच्या किंमती निश्चित करणार नाही. (stock market) त्याऐवजी उत्पादक कंपन्यांना बाजारातील स्पर्धेनुसार स्वतःच्या उत्पादनांच्या किंमती ठरवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच दारूच्या किंमतींसाठी असलेला स्लॅब 16 वरून 8 करण्याचा निर्णयही सरकारने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे मद्यनिर्मिती कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसून आला.
युनायटेड ब्रिवेरीजचा शेअर बीएसईवर 1659.55 रुपयांवर उघडला. दिवसभरात या शेअरमध्ये जोरदार खरेदी झाली आणि तो 7.5 टक्क्यांच्या वाढीसह 1771 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकापर्यंत पोहोचला. बाजार बंद होताना हा शेअर 5.43 टक्क्यांच्या वाढीसह 1736 रुपयांवर बंद झाला. तर युनायटेड स्प्रिट्स लिमिटेडचा शेअर 1311.25 रुपयांवर उघडला होता. दिवसभरात या शेअरमध्येही चांगली तेजी दिसून आली आणि तो 6.9 टक्क्यांच्या वाढीसह 1418 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकापर्यंत पोहोचला. शेअर बाजार बंद होताना हा स्टॉक 1387.50 रुपयांवर स्थिरावला. मागील एका वर्षात या शेअरच्या किमतीत सुमारे 4.06 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. दरम्यान, शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. (stock market) त्यामुळे कोणत्याही स्टॉक, म्युच्युअल फंड किंवा आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.
हेही वाचा :
लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!
वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी