हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार देवपूजेला अत्यंत महत्त्व दिले गेले (theology) आहे. घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहावी तसेच संकटे दूर व्हावीत, यासाठी अनेक जण दररोज देवाची पूजा करतात. मात्र पूजा करताना काही ठराविक नियमांचे पालन करणे आवश्यक मानले जाते. धर्मशास्त्रानुसार योग्य पद्धतीने केलेली पूजा ही अधिक फलदायी ठरते, तर अज्ञानातून झालेल्या चुका कधी कधी वास्तुदोष निर्माण करण्याचे कारणही ठरू शकतात. त्यामुळे पूजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.

हिंदू परंपरेनुसार (theology) आठवड्यातील प्रत्येक दिवस एखाद्या विशिष्ट देवतेला समर्पित असतो. उदाहरणार्थ सोमवार हा भगवान महादेवांचा दिवस मानला जातो, तर शनिवार हा शनिदेवांना समर्पित असतो. या दिवशी त्या देवतेची श्रद्धेने पूजा करून त्यांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण केल्यास विशेष आशीर्वाद मिळतो, अशी श्रद्धा आहे.
पूजेच्या वेळेबाबतही धर्मशास्त्रात विशेष उल्लेख आढळतो. ब्रह्ममुहूर्त हा पूजा आणि साधनेसाठी सर्वात शुभ काळ मानला जातो. सूर्योदयाच्या सुमारे एक तास आधीचा हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. या वेळी मन शांत आणि एकाग्र असते, त्यामुळे या काळात केलेली पूजा अधिक प्रभावी मानली जाते.
पूजा करताना दिशेचाही विशेष विचार करणे आवश्यक मानले गेले आहे. पूजा (theology) करताना कधीही दक्षिण दिशेला तोंड करून बसू नये. शक्यतो पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून पूजा करावी. तसेच देवघराची दिशा देखील महत्त्वाची असते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर असणे सर्वात शुभ मानले जाते, कारण ही दिशा देवतांची दिशा मानली जाते.
देवघर कुठे असावे याबाबतही काही नियम सांगितले गेले आहेत. देवघर कधीही स्वयंपाकघराच्या अगदी जवळ किंवा बेडरूममध्ये ठेवू नये. तसेच देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवणे टाळावे. देवघर हे केवळ देवपूजेसाठीच असावे आणि त्यात पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूशिवाय इतर कोणत्याही वस्तू ठेवू नयेत, असे सांगितले जाते.
देवी-देवतांच्या (theology) मूर्तींबाबतही काही मर्यादा सांगितल्या आहेत. घरातील मूर्ती खूप मोठ्या नसाव्यात. साधारणपणे दोन फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती घरात ठेवणे योग्य मानले जाते. देवघरात काडीपेटी ठेवणे टाळावे, अशीही सूचना दिली जाते.
देवांना जल अर्पण करताना तांब्याच्या पात्राचा वापर करणे शुभ मानले जाते. तसेच पूजेनंतर देवांना गंध आणि नैवेद्य अर्पण करणे विसरू नये. श्रद्धा, स्वच्छता आणि नियमांचे पालन या तीन गोष्टींसह केलेली पूजा ही मनःशांती देणारी आणि घरासाठी मंगलकारक मानली जाते.
हेही वाचा :
Bluetooth आणि Wi-Fi सुरू ठेवल्याने खरंच बॅटरी संपते का? तज्ज्ञ म्हणतात
तुमच्या मुलांचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करू नका नाहीतर
शरीरात प्रोटीनची कमी? दररोजच्या आहारात करा या कडधान्याचा समावेश