कौटुंबिक वादातून जीव द्यायला चाललेल्या एका 39 वर्षीय व्यक्तीला पोलीस मार्शलच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाले आहे. पुण्यातील नांदेड सिटी पोलिसांनी या व्यक्तीला वाचवले आहे.

घरगुती वादातून आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या तरुणाला पुण्यातील सिंहगड रोडवरच्या नांदेड सिटी पोलीस मार्शलने धाडसी कारवाई करत वाचवले असल्याची बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून जीव द्यायला चाललेल्या एका 39 वर्षीय व्यक्तीला पोलीस मार्शलच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाले आहे. लोहगाव पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नांदेड सिटी पोलिसांनी अवघ्या काही वेळात या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. (police) याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या प्रदीप दीपकराव चंदनशिव या 39 वर्षीय व्यक्तीचा जीव नांदेड सिटी मार्शलच्या सतर्कतेमुळे वाचला आहे. प्रदीप हे घरगुती त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या विचारात होते. (police) या संदर्भातील माहिती मिळताच लोहगाव पोलीस ठाण्याने नांदेड सिटी मार्शल पोलीस खराडे आणि होमगार्ड राऊत यांना त्वरित कळवले. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे या व्यक्तीची मनस्थिती खराब असल्याचे पोलिसांना समजले.

पोलीसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तांत्रिक मदतीने त्याचे लोकेशन मिळवले आणि घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला तो व्यक्ती सापडला नाही, मात्र त्यावेळी पोलीसांनी आसपास काम करत असलेल्या शेतकऱ्यांना या व्यक्तीचे वर्णन सांगतले. त्यावेळी शेतकऱ्यांनी लाल कपडा असलेला इसम चारचाकी गाडीसह गेला असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्या दिशेला पाठलाग केला. अखेर वर्णनाप्रमाणे सदर व्यक्ती मिळून आली.

या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने घरगुती त्रासामुळे आत्महत्या करण्यास आल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सुरक्षितपणे नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे आणले. (police) त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली, त्यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. या सर्व प्रकरणावर बोलताना नांदेड सिटी पोलीस स्टेशनने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी म्हटले की, लोहगाव पोलिसांकडून माहिती मिळताच आमच्या मार्शलनी तत्परतेने काम केले. वेळेत लोकेशन ट्रॅक झाल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या मदतीमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचवता आले.

हेही वाचा :

ही’ FD ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम, 8.10 टक्के दराने परतावा, जाणून घ्या

अखेर इराणची माघार, केली सर्वात मोठी घोषणा, जगाला मोठा दिलासा

पश्चिम बंगालच्या सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या, राष्ट्रपतींच्या अपमानावरून PM मोदींची TMC सरकारवर टीका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *