धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आज अनेक वर्किंग महिलांना घरातील कामांसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. ऑफिस, घर आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना अनेकजणी रात्रीच्या वेळी कपडे धुण्याचा पर्याय निवडतात. मात्र वास्तुशास्त्र आणि काही पारंपरिक मान्यतांनुसार ही सवय योग्य मानली जात नाही. यामुळे घरातील वातावरणावर तसेच आरोग्यावरही काही परिणाम होऊ शकतात, असे सांगितले जाते.

वास्तुशास्त्रानुसार दिवस आणि रात्रीच्या ऊर्जेमध्ये मोठा फरक असतो. दिवसाची सुरुवात सूर्याच्या सकारात्मक ऊर्जेने होते, तर रात्रीचा काळ तुलनेने शांत आणि नकारात्मक ऊर्जा सक्रिय होण्याचा मानला जातो. (Vastu Shastra )त्यामुळे काही तज्ञांच्या मते, रात्री कपडे धुणे किंवा ओले कपडे बाहेर टांगणे टाळणे योग्य मानले जाते. असे मानले जाते की रात्रीच्या वेळी वातावरणात नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात सक्रिय असते. ओल्या कपड्यांमध्ये ही ऊर्जा सहज शोषली जाऊ शकते, अशी धारणा आहे. जर असे कपडे घरात वापरले गेले तर त्याचा परिणाम घरातील वातावरणावर होऊ शकतो आणि कुटुंबात तणाव किंवा कलह वाढण्याची शक्यता निर्माण होते, असे काही लोक मानतात.
वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर रात्री कपडे धुतल्यावर ते योग्य प्रकारे वाळत नाहीत. सूर्यप्रकाश हा नैसर्गिक जंतूनाशक मानला जातो. सूर्याच्या किरणांमुळे कपड्यांमधील अनेक प्रकारचे जंतू आणि बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. पण रात्री कपडे वाळवल्यास त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे कपड्यांमध्ये ओलावा राहू शकतो आणि त्यातून त्वचेचे विकार, खाज किंवा ॲलर्जी होण्याचा धोका वाढू शकतो. (Vastu Shastra) काही धार्मिक मान्यतांनुसार रात्रीच्या वेळी अनावश्यकपणे पाणी वाहू देणे किंवा कपडे धुणे हे घरातील समृद्धीसाठी योग्य मानले जात नाही. अशा सवयींमुळे आर्थिक अडचणी किंवा मानसिक अस्वस्थता वाढू शकते, अशीही धारणा काही ठिकाणी आढळते.
तज्ज्ञांच्या मते, शक्य असल्यास कपडे दिवसा धुणे आणि सूर्यप्रकाशात वाळवणे अधिक योग्य ठरते. (Vastu Shastra) यामुळे कपडे स्वच्छ राहतात, जंतूंचा धोका कमी होतो आणि घरातील सकारात्मक वातावरण टिकून राहण्यास मदत होते. योग्य वेळेचे नियोजन केल्यास या सवयीचा आरोग्य आणि घराच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा :
ही’ FD ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम, 8.10 टक्के दराने परतावा, जाणून घ्या
अखेर इराणची माघार, केली सर्वात मोठी घोषणा, जगाला मोठा दिलासा