नागपूरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे कॅटरिंग व्यवसायिकांपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम लग्नसमारंभ, वाढदिवस, सत्कार सोहळे आणि विविध कार्यक्रमांच्या आयोजनावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (cylinder) वाढत्या अडचणींमुळे नागपूरमधील कॅटरिंग व्यवसायिकांनी १५ मार्च २०२६ पासून नवीन कॅटरिंग ऑर्डर स्वीकारणे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

सध्या आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असून त्याचा फटका आता हॉटेल आणि कॅटरिंग व्यवसायालाही बसू लागला आहे. (cylinder) रोज हजारो लोकांसाठी अन्न तयार करणाऱ्या कॅटरर्सना मोठ्या प्रमाणात एलपीजी सिलेंडरची आवश्यकता असते. मात्र सध्या उपलब्ध असलेला गॅस साठा मर्यादित असून पुढील काही दिवसांमध्ये सिलेंडर संपल्यावर काय करायचे, असा मोठा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा ठाकला आहे.

कॅटरिंग व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, गॅस एजन्सींना संपर्क साधला असता सध्या एकही अतिरिक्त सिलेंडर उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मोठ्या कार्यक्रमांच्या ऑर्डर स्वीकारणे धोक्याचे ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. लग्नसराईच्या हंगामात हजारो लोकांसाठी कमी वेळेत जेवण तयार करावे लागते. (cylinder) अशा परिस्थितीत जुन्या पद्धतीने चुलीवर स्वयंपाक करून तेवढ्या वेगाने अन्न तयार करणे शक्य नसल्याचेही व्यावसायिक सांगत आहेत.

या निर्णयामुळे येत्या काही दिवसांत नागपूरमधील लग्नसमारंभ आणि इतर मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गॅस पुरवठा सुरळीत झाला तरच परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा कॅटरिंग व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

आयपीएल 2026 स्पर्धेत मोठा बदल होणार! 10 सामन्यांबाबत होणार निर्णय

 सावधान! उष्णतेची मोठी लाट, मुंबईलाही ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर!

कोल्हापूर महापालिकेचा पहिला दणका! रहिवासी पाणीपट्टीसाठी १० टक्के दरवाढ निश्चित होणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *