देशात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा कोणताही तुटवडा नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असून लहान नोटांसंदर्भात पसरत असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. संसदेत दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांना लवकरच एटीएममधून थेट १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा काढता येणार आहेत. (rumors) यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘स्मॉल व्हॅल्यू डिस्पेंसर’ हा विशेष पायलट प्रकल्प सुरू केला आहे.

सध्या बहुतांश एटीएममधून पैसे काढल्यावर ५०० किंवा २०० रुपयांच्या मोठ्या नोटाच मिळतात. त्यामुळे किरकोळ व्यवहार करताना अनेकांना सुट्या पैशांची अडचण निर्माण होते. रिक्षा भाडे, भाजीपाला खरेदी किंवा छोट्या व्यवहारांसाठी अनेकदा लोकांना सुट्टे पैसे शोधावे लागतात. (rumors) ही समस्या लक्षात घेऊन आरबीआयने लहान नोटा देणारी स्वतंत्र यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. स्मॉल व्हॅल्यू डिस्पेंसर हे एक विशेष प्रकारचे एटीएम असेल, जे प्रामुख्याने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. पारंपरिक एटीएममध्ये कॅसेटची क्षमता मर्यादित असल्यामुळे बँका मोठ्या नोटांना प्राधान्य देतात. मात्र या नवीन यंत्रणेमुळे नागरिकांना लहान नोटा सहज उपलब्ध होतील.

केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार, २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत देशात १० रुपयांच्या ४३९.४० कोटी, २० रुपयांच्या १९३.७० कोटी आणि ५० रुपयांच्या १३०.३० कोटी नोटांचा पुरवठा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे १० रुपयांच्या नोटांच्या पुरवठ्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. देशात डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असला तरी ग्रामीण आणि निमशहरी भागात रोख व्यवहारांचे महत्त्व अजूनही कायम आहे. या पार्श्वभूमीवर लहान नोटा सहज उपलब्ध करून देण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. (rumors) यामुळे किरकोळ व्यवहार अधिक सोपे होतील आणि सुट्या पैशांसाठी होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा :

आयपीएल 2026 स्पर्धेत मोठा बदल होणार! 10 सामन्यांबाबत होणार निर्णय

 सावधान! उष्णतेची मोठी लाट, मुंबईलाही ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर!

कोल्हापूर महापालिकेचा पहिला दणका! रहिवासी पाणीपट्टीसाठी १० टक्के दरवाढ निश्चित होणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *