जळगावच्या एरंडोल येथे ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात करण्यात आला. (horrific)लांडापुरा भिलाटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पीडित मुलगी घरातून अचानक गायब झाली. नातेवाईकाच्या घरी ही मुलगी संशयास्पद स्थितीत आढळून आली. या मुलीवर ५७ वर्षांच्या नातेवाईकानेच लैंगिक अत्याचार केला. या घटनेप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातील केवडीपुरा येथील एक महिला आपल्या कुटुंबासह लांडापुरा भिलाटी परिसरात राहत आहे. मंगळवारी दुपारी सुमारास ती महिला घराजवळील शौचालयास गेली होती. त्यावेळी तिची तिन्ही लहान मुलं घरात खेळत होती. काही वेळानंतर ही महिला घरी परत आली. तिची ४ वर्षांची मुलगी घरात दिसून आली नाही. यामुळे महिलेने परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाच्या घरी जाऊन चौकशी केली (horrific)असता त्याच्या घरातच संशयास्पद परिस्थितीमध्ये मुलगी दिसून आली. महिलेने या मुलीला तात्काळ आपल्या घरी आणले. नातेवाईकानेच आपल्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने महिलेला मोठा धक्का बसला. या घटनेनंतर महिलेने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून संबंधित व्यक्तीविरुद्ध एरंडोल (horrific)पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचारासंदर्भातील गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास एरंडोल पोलिस करत आहेत. या घटनेमुळे जळगावमध्ये खळबळ उडाली.
हेही वाचा :
उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेला उजळवण्यासाठी वापरा घरगुती सिरम, बनवण्याची योग्य पद्धत काय?
10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय