जागतिक स्तरावर वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता आर्थिक बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरात अस्थिरता निर्माण झाली असून डॉलर मजबूत होत असतानाच सोनं-चांदीच्या दरातही मोठे चढउतार सुरू आहेत. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वाढत्या प्रमाणात कल वाढत असल्याने त्याच्या किमती सातत्याने वरच्या दिशेने जाताना दिसत आहेत.

सुमारे बारा दिवसांपूर्वी इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ला झाल्यानंतर या युद्धाची ठिणगी भडकली. (global) या संघर्षामुळे थेट युद्धात सहभागी नसलेल्या अनेक देशांनाही आर्थिक फटका बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेचा परिणाम भारतातील सराफ बाजारावरही होत असून सोनं-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ होत आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ नोंदवली गेली आहे. आज सोन्याच्या किमतीत सुमारे १०० रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. या वाढीनंतर एक तोळा म्हणजेच १० ग्रॅम सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख ६५ हजार ४१८ रुपयांवर पोहोचला आहे. (global) गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढताना दिसत असून सर्वसामान्य ग्राहकांसाठी ते आवाक्याबाहेर जात असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र आज मोठी घसरण नोंदवली गेली आहे. जळगावच्या बाजारात चांदीच्या दरात तब्बल चार हजार रुपयांची घट झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचा दर जीएसटीसह सुमारे २ लाख ८२ हजार २२० रुपयांवर आला आहे.

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता आणि डॉलरच्या वाढत्या किमती यामुळे सोनं-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार होत आहेत. युद्धाचा आज बारावा दिवस सुरू असताना त्याचे परिणाम अजूनही बाजारात दिसत आहेत. (global) त्यामुळे पुढील काही दिवसांतही सराफ बाजारात दरांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

आयपीएल 2026 स्पर्धेत मोठा बदल होणार! 10 सामन्यांबाबत होणार निर्णय

 सावधान! उष्णतेची मोठी लाट, मुंबईलाही ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर!

कोल्हापूर महापालिकेचा पहिला दणका! रहिवासी पाणीपट्टीसाठी १० टक्के दरवाढ निश्चित होणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *