अनेकांना जेवण झाल्यानंतर काहीतरी खाण्याची सवय असते. काहीजण गोड पदार्थ खातात, तर काहीजण तोंडाला चव यावी म्हणून वेगवेगळे स्नॅक्स खातात. मात्र जेवणानंतर काय खावे याचा थेट परिणाम पचनक्रियेवर आणि एकूण आरोग्यावर होत असतो. चुकीचे पदार्थ खाल्ल्यास गॅस, अॅसिडिटी किंवा पोटफुगीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. (foods) त्यामुळे जेवणानंतर योग्य पदार्थांची निवड करणे महत्त्वाचे ठरते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर थोडीशी बडीशेप खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. बडीशेपमध्ये असलेले नैसर्गिक घटक पोटात गॅस तयार होण्याचे प्रमाण कमी करतात आणि तोंडाला ताजेपणा देतात.(foods) त्यामुळे अनेक ठिकाणी जेवणानंतर बडीशेप खाण्याची परंपराही दिसून येते.
भाजलेले जिरे किंवा जिरे पाणी देखील पचनासाठी उपयुक्त मानले जाते. जिऱ्यामध्ये असे घटक असतात जे पोटातील एन्झाईम्सची क्रिया वाढवतात आणि अन्न पचवण्याची प्रक्रिया सुलभ करतात. त्यामुळे जेवणानंतर थोडेसे जिरे खाणे किंवा जिरे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.
आले देखील पचन सुधारण्यासाठी उपयोगी मानले जाते. आल्याचा छोटा तुकडा किंवा आले, लिंबू आणि मीठ एकत्र करून खाल्ल्यास पोटातील जडपणा कमी होण्यास मदत होते आणि पचनक्रिया वेगाने होते. मात्र काही लोकांना आले सर्व परिस्थितीत योग्य असेलच असे नाही, त्यामुळे नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
पपई हे फळ पचनासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाइम असते, जे अन्न लवकर पचण्यास मदत करते. त्यामुळे जेवणानंतर थोडीशी पपई खाल्ल्यास पोट हलके वाटण्यास मदत होऊ शकते.
याशिवाय जेवणानंतर एक ग्लास ताक पिणेही आरोग्यासाठी चांगले मानले जाते. ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करण्यास मदत करतात आणि पचनक्रिया सुरळीत ठेवतात. (foods) काहीजण जेवणानंतर गुळाचा छोटा तुकडाही खातात. गुळामुळे पचनक्रिया सक्रिय होते आणि पोट स्वच्छ राहण्यास मदत होते. योग्य आहाराची सवय लावल्यास पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळता येऊ शकतात.
हेही वाचा :
युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान
वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या
कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर