चेन्नईमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार (sexually assaulted) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला वेग दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, (sexually assaulted) ही घटना ९ मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. पीडित तरुणी कोट्टूरपूरम पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावरून पायी जात होती. त्यावेळी काही तरुण कारमधून आले आणि त्यांनी जबरदस्तीने तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला बेशुद्ध करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. साधारणपणे एका तासानंतर आरोपींनी तिला कारमधून खाली उतरवून तिथून पसार झाल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत पीडित तरुणीने जवळच्या पोलिस ठाण्यात (sexually assaulted) जाऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, पीडित तरुणीने (sexually assaulted) आणखी एक गंभीर आरोप केला आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी दोन वेगवेगळ्या फोन नंबरवरून तिला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवण्यात आले. त्या मेसेजमध्ये तिचे मॉर्फ केलेले फोटो पाठवून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकारामुळे प्रकरण अधिक गंभीर झाले असून पोलिस सायबर अँगलनेही तपास करत आहेत.
या घटनेमुळे चेन्नईमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता (sexually assaulted) व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले असून तपास सुरू आहे.
हेही वाचा :
युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान
वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या
कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर