इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका टोकाच्या वळणावर पोहोचला आहे.(reached) अमेरिकेने इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी आणि त्यांच्या ९ वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यास १ कोटी डॉलर्सचे सुमारे ८३ कोटी रुपये बक्षीस जाहीर केले आहे.’रिवॉर्ड्स फॉर जस्टिस’ अंतर्गत माहिती देणाऱ्याला सुरक्षित स्थलांतराचीही ऑफर दिलीय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑपरेशन एपिक फ्युरी द्वारे इराणची राजवट संपवण्याचा थेट इशारा दिला आहे.

‘रिवॉर्ड्स फॉर जस्टिस’ अंतर्गत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे.(reached) माहिती देणाऱ्या व्यक्तीला केवळ बक्षीसच नाही, तर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची ऑफरही अमेरिकेने दिली आहे.२८ फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. यातून इराणवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इराणची अंतर्गत यंत्रणा कमकुवत करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे, हा या रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे.
अयातुल्ला अली खामेनी यांचा हा दुसरा मुलगा असून ते एक कट्टरपंथीय (reached) आणि प्रभावशाली रणनीतिकार म्हणून ओळखले जातात. १९८० च्या दशकात इराण-इराक युद्धात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’वर त्यांची मोठी पकड आहे. २०१९ मध्येच अमेरिकेने त्यांच्यावर कडक निर्बंध लादले होते.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?