आखाती देशातील युद्धामुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.(cylinder)व्यावसायिक गॅसची बुकिंग तर बंद करण्यात आली आहे. याचसोबत एलपीजी गॅसच्या किंमतीदेखील वाढवण्यात आल्या आहेत. घरगुती एलपीजी गॅसची किंमत ६० रुपयांनी वाढली आहे तर कमर्शियल गॅसची किंमत ११५ रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे घरगुती गॅसच्या किंमती ९०० रुपयांपेक्षा जास्त झाल्या आहेत. एकीकडे एलपीजी गॅसचा तुटवडा आणि दुसरीकडे गॅसच्या किंमती वाढत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. एलपीजी गॅस बुकिंगसाठी रांगा लागल्या आहेत. दरम्यान, प्रत्येक शहरात एलपीजी गॅसच्या किंमती वेगवेगळ्य आहेत. तुमच्या शहरातील एलपीजी गॅसच्या किंमती वाचा.मुंबईत एलपीजी गॅसची किंमत ९१२.५० रुपये आहे. नवी दिल्लीत १४ किलो वजनाच्या एलपीजी गॅसची किंमत ९१३ रुपये झाली आहे. (cylinder)कोलकत्त्यात एलपीजी गॅसची किंमत ९३९ रुपये आहे. चेन्नईत एलपीजी गॅसची किंमत ९२८.५० रुपये आहे.

एलपीजी गॅसच्या किंमती शहरानुसार बदलत असतात. प्रत्येक राज्य सरकारचे (cylinder) कर हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे हे दर बदलत असतात. दरम्यान, फार जास्त मोठा बदल नसतो. थोड्याफार फरकाने या किंमती कमी जास्त असतात. दरम्यान, आठवड्याभरापूर्वी एलपीजीचे दर वाढले आहेत. त्याआधी एलपीजी गॅसची किंमत ८५३ रुपये होती. व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण सध्या बंद आहेत. मात्र, या गॅसच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत. मुंबईत १९ किलो वजनाच्या एलपीजी गॅसची किंमत १८३६ रुपये आहे. नवी दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅसची किंमत १८८४.५० रुपये आहे. कोलकत्त्यात कमर्शियल गॅसची किंमत १९८८.५० रुपये आहे. चेन्नईत कमर्शियल गॅसची किंमत २०४३ रुपये आहे.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?