नागपूरच्या डॉक्टरांनी सलग १०० मिनिटे सीपीआर देऊन एका ११ वर्षीय मुलाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. जनरेटर अंगावर पडल्याने हा मुलगा गंभीर जखमी झाला होता.

वैद्यकीय क्षेत्रात अशक्य वाटणारी गोष्ट नागपूरच्या डॉक्टरांनी शक्य करून दाखवली आहे. एका भीषण अपघातात मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या ११ वर्षीय बालकाला सलग १०० मिनिटे सीपीआर देऊन डॉक्टरांनी पुनर्जन्म दिला आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार साधारणपणे २० ते ३० मिनिटे सीपीआर दिला जातो. मात्र या प्रकरणात डॉक्टरांनी दाखवलेला संयम आणि जिद्द एका बालकासाठी जीवदान ठरली आहे.
राहुल (नाव बदललेले आहे) हा ११ वर्षांचा मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळून घरी परतत होता. वाटेत एका मिरवणुकीतील वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यावरील अवजड जनरेटर सेट थेट राहुलच्या अंगावर कोसळला. या भीषण अपघातात राहुल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने नागपूरच्या धंतोली येथील नेल्सन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात आणले तेव्हा राहुलची अवस्था अत्यंत चिंताजनक होती. त्याला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. तसेच नाक, कान आणि तोंडातून रक्तस्त्राव होत होता. डॉक्टरांनी त्याला तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवले. (CPR) मात्र काही वेळातच त्याच्या हृदयाचे ठोके थांबले. तांत्रिकदृष्ट्या तो मृत्यूच्या छायेत होता.
पण याप्रकरणी डॉक्टरांनी धीर सोडला नाही. त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. (CPR) त्यामुळे राहुलला जीवदान मिळाले. बालरोग तज्ज्ञ डॉ. यश बानाईत आणि त्यांच्या चमूने हार न मानण्याचे ठरवले. राहुलला कोणताही पूर्व आजार नसल्याने डॉक्टरांनी त्याला शेवटपर्यंत वाचवण्याचा निर्धार केला. वैद्यकीय मानकांनुसार २०-३० मिनिटे सीपीआर दिला जातो, परंतु येथे डॉक्टरांनी तब्बल १०० मिनिटांहून अधिक काळ सातत्याने सीपीआर देणे सुरू ठेवले.
शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर राहुलच्या हृदयाचे ठोके परत आले. इतका वेळ हृदय बंद राहिल्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने मेंदूचे कायमस्वरूपी नुकसान होण्याचा मोठा धोका होता. मात्र, डॉक्टरांचे उपचार आणि मुलाची जगण्याची इच्छाशक्ती यामुळे तो या धोक्यातूनही सुखरूप बाहेर पडला. (CPR) आता हा चिमुकला पूर्णपणे बरा झाला असून स्वतःच्या पायावर चालत सुखरूप घरी परतला आहे. या यशस्वी उपचारामुळे डॉ. यश बानाईत आणि त्यांच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा :
खुशखबर! WhatsAppचं भन्नाट फीचर, App डाउनलोड न करता आता करा थेट चॅट
विराटचं मिशन नंबर 1, किंग कोहली 19 व्या हंगामासाठी सज्ज, मोठा विक्रम निशाण्यावर
एकनाथ शिंदेंनंतर आता शिवसेनेचा हा बडा नेता दिल्ली दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण