अभिनेत्री सारा अली खान हिचा जन्म मुस्लीम कुटुंबात झाला. तरी देखील सारा भगवान शंकर यांची मोठी भक्त आहे. केदारनाथ येथे देखील ती कायम जाते. पण आता सारा हिच्यासाठी केदारनाथचे दरवाजे बंद करण्यात आलेत, यावर महिला खासदाराने मोठं वक्तव्य केलं आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री महादेवाची भक्त आहे. तिच्या ‘केदारनाथ’ या पहिल्या सिनेमापासूनच अभिनेत्रीता बाबा केदारनाथांवर गाढ श्रद्धा आहे आणि ती त्या स्थळाला वारंवार भेट देते. शिवाय सारा तिच्या यात्रेचे फोटो आणि व्हिडीओ देखील चाहत्यांसोबत शेअर करत असते. फक्त केदारनाथच नाही तर, सारा उज्जैन आणि इतर ज्योतिर्लिंगांनाही भेट देते. सोशल मीडियावर वारंवार ट्रोल होत असूनही, साराच्या श्रद्धेची आणि साधेपणाची प्रशंसा केली जाते. पण आता सारा अली खान हिचे केदारनाथ येथील दरवाजे बंद करण्यात आले आहेत, जोपर्यंत सारा ‘मी सनातनी आहे असं प्रतीज्ञापत्रात लिहून देत नाही
सांगायचं झालं तर, बद्री – केदार समितीने एक नवीन नियम लागू केला आहे. ज्यामध्ये जे हिंदू नाहीत पण, त्यांना केदारनाथ येथे दर्शन घ्यायचं आहे, त्यांना एक प्रतिज्ञापत्र समितीला द्यावं लागणार आहे. (Kedarnath) ज्यामध्ये त्यांना त्यांच्या हिंदू धर्मावरील श्रद्धेचा पुरावा सादर करावा लागेल. हा आदेश केदारनाथला वारंवार भेट देणाऱ्या सारा अली खानसह सर्व गैर-हिंदू पर्यटकांना लागू करण्यात आला आहे.
आता यावर अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी देखील स्वतःचं मत मांडलं आहे. कंगना म्हणाल्या, येथे जे कोणी आहेत, ते सगळे सनातनी आहेत. सनातन धर्माचा शेवट नाहीये सर्व धर्म हजार, पंधरा हजार पूर्वीचे आहे. पण फक्त सनातन सत्य आहे ती (सारा) देखील सनातनी आहे तर लिहून देण्यास काय हरकत आहे.(Kedarnath) तिने सनातनी आहे.असं लिहून द्यावं असं देखील कंगना म्हणाल्या.
सांगायचं झालं तर, बद्री-केदार मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी सांगितल्यानुसार, ‘जे भक्त हिंदू नाहीत, पण त्यांची महादेवावर श्रद्धा आहे, त्यांना सनातनी असल्याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. (Kedarnath) सनातन धर्मावर विश्वास ठेवणारे आणि ‘मी सनातनी आहे, माझा हिंदुत्वावर विश्वास आहे’ असे लेखी निवेदन सादर करणाऱ्या गैर-हिंदू भक्तांचं स्वागत आहे.’, असं देखील हेमंत द्विवेदी म्हणाले आहेत.
हेही वाचा :
खुशखबर! WhatsAppचं भन्नाट फीचर, App डाउनलोड न करता आता करा थेट चॅट
विराटचं मिशन नंबर 1, किंग कोहली 19 व्या हंगामासाठी सज्ज, मोठा विक्रम निशाण्यावर
एकनाथ शिंदेंनंतर आता शिवसेनेचा हा बडा नेता दिल्ली दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण