भारताच्या टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नवीन आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन सादर करत असते. आता कंपनीने युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन एक दीर्घकालीन आणि फायदेशीर प्लॅन बाजारात आणला असल्याची चर्चा रंगली आहे.

या नवीन प्लॅनची किंमत 2025 रुपये ठेवण्यात आली असून, यात ग्राहकांना तब्बल 200 दिवसांची वैधता दिली जाते. (Reliance Jio) त्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज कमी होते आणि दीर्घकाळासाठी कनेक्टिव्हिटी कायम राहते. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. संपूर्ण कालावधीत हा डेटा मिळून जवळपास 500 GB इतका होतो, जो जास्त इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरतो.
कॉलिंग सुविधांबाबतही कंपनीने कोणतीही तडजोड केलेली नाही. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा दिली जाते. यासोबतच दररोज 100 फ्री एसएमएसचाही लाभ मिळतो, (Reliance Jio) ज्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त खर्च करण्याची गरज राहत नाही.
सध्याच्या काळात महिन्याच्या प्लॅनचा वारंवार रिचार्ज करणे अनेकांना त्रासदायक ठरते, तर वार्षिक प्लॅन काहींना महाग वाटतो. अशा परिस्थितीत मध्यम कालावधीचा हा प्लॅन एक चांगला पर्याय म्हणून पाहिला जात आहे. जास्त डेटा, दीर्घ वैधता आणि परवडणारी किंमत यामुळे हा प्लॅन मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आकर्षित करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
खुशखबर! WhatsAppचं भन्नाट फीचर, App डाउनलोड न करता आता करा थेट चॅट
विराटचं मिशन नंबर 1, किंग कोहली 19 व्या हंगामासाठी सज्ज, मोठा विक्रम निशाण्यावर
एकनाथ शिंदेंनंतर आता शिवसेनेचा हा बडा नेता दिल्ली दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण