आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. असं असताना (new records) फलंदाज या स्पर्धेत नवे विक्रम प्रस्थापित करतील यात काही शंका नाही. या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा वर्षाव होईल. पण या स्पर्धेच्या काही दिग्गज खेळाडूंना एकही षटकार मारता आलेला नाही. चला जाणून घेऊयात त्यांच्याबाबत

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पण त्याला एकही षटकार मारता आलेला नाही. तसा तो गोलंदाजीची भूमिका बजाववतो. पण 52 आयपीएल सामन्यात 111 धावा केल्या. यात 11 चौकार मारले पण षटकार एकही नाही.
आयपीएलमध्ये 2012 मध्ये पंजाब किंग्सकडून (new records) खेळलेल्या यष्टीरक्षक-फलंदाज नितीन सैनीनेही कधीही षटकार मारलेला नाही. या लीगमध्ये 10 सामने खेळलेल्या सैनीने 140धावा केल्या. पण षटकार काही मारता आला नाही. त्यामुळे त्याचं नाव या यादीत नोंदवलं गेलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कनेही आयपीएलमध्ये एकही षटकार मारलेला नाही. 2012मध्ये पुणे वॉरियर्सकडून खेळलेल्या क्लार्कने सहा डावांमध्ये 98 धावा केल्या होत्या. पण षटकार काही नशिबी आला नाही. त्यानंतर त्याची आयपीएल कारकीर्दही संपली.
पुणे वॉरियर्सचा आणखी एक खेळाडू, कॅलम फर्ग्युसन, यानेही आयपीएलमध्ये (new records) नऊ सामने खेळले असून एकही षटकार मारलेला नाही. या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने आयपीएलमध्ये 98 धावा केल्या आहेतऑस्ट्रेलियाचा आणखी एक माजी अष्टपैलू खेळाडू ली अँड्र्यू कारसेल्डाइन… यानेही आयपीएलमध्ये एकही षटकार मारलेला नाही. राजस्थान रॉयल्सकडून पाच सामने खेळलेल्या कारसेल्डाइनने 81 धावा केल्या आहेत. पण त्याने बॅटने एकही षटकार मारलेला नाही.
हेही वाचा :
खुशखबर! WhatsAppचं भन्नाट फीचर, App डाउनलोड न करता आता करा थेट चॅट
विराटचं मिशन नंबर 1, किंग कोहली 19 व्या हंगामासाठी सज्ज, मोठा विक्रम निशाण्यावर
एकनाथ शिंदेंनंतर आता शिवसेनेचा हा बडा नेता दिल्ली दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण