अनेक क्रिकेट एक्सपर्टनी या खेळाडूंची सॅलरी कमी असल्याबद्दल आवाज उठवला होता. बीसीसीआय आता त्यांचं वेतन वाढवू शकते. चांगलं खेळूनही त्यांच्यावर अन्याय सुरु होता.

टी20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियातील दोन खेळाडूंसाठी चांगली बातमी आहे. (cricket) त्यांची सॅलरी वाढवण्यात येणार आहे. वर्ल्ड कपमधील दमदार प्रदर्शनाचा त्यांना फायदा झाला आहे. या खेळाडूंची बीसीसीआयने दखल घेतली आहे. चांगलं प्रदर्शन करुनही सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांची सॅलरी कमी झाली होती. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल सतत चांगलं प्रदर्शन करत होते. बुमराह आणि अक्षरची सॅलरी वाढवण्यासाठी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. बुमराह सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या ए कॅटेगरीमध्ये आहे. (cricket) त्याची सॅलरी कमी होऊ नये अशी बीसीसीआयची इच्छा आहे. रिपोर्ट्समध्ये हे म्हटलं आहे.बीसीसीआयच्या सेंट्रल ए कॉन्ट्रॅक्टमध्ये वर्षाला पाच कोटी मिळतात. बीसीसीआयने ए प्लस कॅटेगरी संपवली आहे. त्या अंतर्गत बुमराहला 7 कोटी मिळायचे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार बुमराहला कसे पैसे वाढवून द्यायचे त्यावर बीसीसीआय काम करत आहे. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितलं की, बुमराहला त्याच्या हक्काचे पैसे कसे द्यायचे यावर बोर्ड मार्ग शोधत आहे. काही खेळाडू आहेत, ज्यांची सॅलरी कमी झालीय. सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बदल होऊ शकतात. बीसीसीआयने बदल केल्यास टी20 टीमचा उपकर्णधार अक्षर पटेलची सुद्धा सॅलरी वाढू शकते. हैराण करणारी बाब म्हणजे अक्षर पटेल ग्रेड सी कॅटेगरीमध्ये आहे. (cricket) त्याची सॅलरी फक्त एक कोटी आहे. दोन टी20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अक्षर पटेलचं महत्वाचं योगदान होतं. अनेक क्रिकेट एक्सपर्टनी या खेळाडूंची सॅलरी कमी असल्याबद्दल आवाज उठवला होता. बीसीसीआय आता त्यांचं वेतन वाढवू शकते.ग्रेड बी मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि वॉशिंगटन सुंदर आहे.
ग्रेड सी मध्ये अक्षर पटेल, रिंकू सिंह, तिलक वर्मा, शिवम दुबे, अर्शदीप सिंह, संजू सॅमसन, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, नीतीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, साई सुदर्शन, रवि बिश्नोई आणि ऋतुराज गायकवाड़ आहे.
हेही वाचा :
खुशखबर! WhatsAppचं भन्नाट फीचर, App डाउनलोड न करता आता करा थेट चॅट
विराटचं मिशन नंबर 1, किंग कोहली 19 व्या हंगामासाठी सज्ज, मोठा विक्रम निशाण्यावर
एकनाथ शिंदेंनंतर आता शिवसेनेचा हा बडा नेता दिल्ली दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण