देशभरात सध्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे नागरिकांना (shortage of LPG gas) मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर रिकामे सिलिंडर घेऊन लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे पुरवठ्यावर ताण आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात आहेत.

दरम्यान, या संकटकाळात काही गैरप्रकारही समोर (shortage of LPG gas) येत आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार वाढल्याच्या तक्रारी येत असून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवीन मार्ग वापरले जात आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी के.सी. सेंथील राजन यांनी नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या मोबाईलवर गॅस बिलाच्या नावाने APK फाईल पाठवून फसवणूक केली जात आहे. या फाईलद्वारे बँकेची गोपनीय माहिती आणि ओटीपी मिळवून खात्यातील पैसे काही क्षणातच लंपास केले जात आहेत. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की अशा प्रकारचे संदेश मिळाल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवावी आणि कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नये.
इंधन पुरवठ्याबाबतही सरकार सतर्क आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी (shortage of LPG gas) स्पष्ट केले आहे की पेट्रोल किंवा इतर इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ दिला जाणार नाही. देशातील पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले असून परदेशातून येणाऱ्या पुरवठ्यावरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. संबंधित मंत्रालये एकत्रितपणे काम करत असून नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
याच पार्श्वभूमीवर (shortage of LPG gas) सरकारने पर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पाईप नेचरल गॅस म्हणजेच पीएनजीचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. व्यावसायिक ग्राहकांना शक्य तितक्या लवकर पीएनजीकडे वळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर नवीन पीएनजी कनेक्शन देण्यात आले असून अर्जांवर जलद गतीने प्रक्रिया करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता पीएनजी कनेक्शन फक्त सात दिवसांत देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या परतीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. फेब्रुवारी अखेरपासून आतापर्यंत लाखो भारतीय सुरक्षितपणे देशात परतले आहेत. काही देशांतील हवाई सेवा बंद असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र आता विशेष उड्डाणांच्या माध्यमातून नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मोठा दिलासा मिळत आहे.
एकूणच, एलपीजी टंचाई, फसवणुकीचे प्रकार आणि जागतिक परिस्थिती यांचा (shortage of LPG gas) एकत्रित परिणाम देशावर दिसून येत असला, तरी सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांनीही सतर्क राहून अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणे आणि अफवांपासून दूर राहणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा
मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…
संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच