वजन कमी करण्यासाठी धावणे की चालणे हा प्रश्न अनेकांच्या मनात (frequently occupies) कायम असतो. जलद आणि जास्त मेहनतीचा व्यायाम केल्यानेच वजन पटकन कमी होते, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र प्रत्येकासाठी धावणे शक्यच असते असे नाही. गुडघेदुखी, कमी स्टॅमिना किंवा लवकर थकवा येणे यामुळे अनेकजण धावण्यापेक्षा चालण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे फक्त चालूनही वजन कमी होऊ शकते का, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो.

फिटनेसच्या दृष्टीने (frequently occupies) पाहिले तर चालणे आणि धावणे या दोन्ही प्रकारच्या व्यायामाचे वेगळे फायदे आहेत. धावण्यामुळे कमी वेळात जास्त कॅलरी बर्न होतात, त्यामुळे जलद परिणाम दिसून येतात. दुसरीकडे चालणे हा तुलनेने सौम्य व्यायाम असून तो जास्त काळ टिकवून ठेवता येतो. त्यामुळे सातत्य राखण्यासाठी आणि शरीरावर कमी ताण देण्यासाठी चालणे हा अधिक सुरक्षित पर्याय मानला जातो.
संशोधनानुसार, समान अंतर पार केल्यास धावणाऱ्या व्यक्तींमध्ये शरीरातील चरबी आणि वजन अधिक वेगाने कमी होताना दिसते. याचे कारण म्हणजे धावण्याची तीव्रता जास्त असते. उदाहरणार्थ, साधारण ७० किलो वजन असलेली व्यक्ती अर्धा तास धावल्यास सुमारे ३०० कॅलरी खर्च करते, तर त्याच वेळेत वेगाने चालल्यास १४० ते १६० कॅलरी बर्न होतात. त्यामुळे कमी वेळात अधिक परिणाम हवे असतील तर धावणे उपयुक्त ठरते.
मात्र याचा अर्थ चालणे कमी प्रभावी आहे असे नाही. नियमितपणे आणि (frequently occupies) योग्य वेगाने चालल्यास तेही वजन कमी करण्यात मोठी मदत करू शकते. विशेषतः नवशिके, जास्त वजन असलेले लोक किंवा सांधेदुखी असलेले रुग्ण यांच्यासाठी चालणे अधिक सुरक्षित आणि टिकाऊ पर्याय ठरतो. दीर्घकाळ सातत्याने चालल्यास शरीरातील कॅलरी बर्न होऊन हळूहळू वजन कमी होऊ शकते.
शेवटी, धावणे की (frequently occupies) चालणे यापेक्षा सातत्य आणि वेळ अधिक महत्त्वाचा ठरतो. जर एखादी व्यक्ती रोज ४५ ते ६० मिनिटे वेगाने चालत असेल, तर ती कमी वेळ धावण्याइतकीच कॅलरी बर्न करू शकते. त्यामुळे आपल्या शरीराची क्षमता, आरोग्यस्थिती आणि जीवनशैली लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा
मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…
संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच