भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा(oil) आयातदार देश आहे. देशातील एकूण गरजेपैकी तब्बल 85 टक्के कच्चं तेल भारत बाहेरून खरेदी करतो. गेल्या दोन वर्षांपासून रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात होत असून, एप्रिल ते जून 2025 दरम्यान रशियाचा वाटा 35 ते 40 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सुरुवातीला भारताला रशियाकडून प्रति बॅरल 40 डॉलरपर्यंत सूट मिळत होती, मात्र ती आता घटून फक्त 2.70 डॉलर इतकी राहिली आहे.

या घडामोडींमुळे अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत — जर भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद केली, तर पेट्रोल-डिझेलचे भाव किती वाढतील? ग्राहकांवर त्याचा किती मोठा ताण पडू शकतो?
रशियाच्या डिस्काउंटमुळे मिळतोय दिलासा :
रशियाकडून मिळणाऱ्या मोठ्या सवलतींमुळे भारताला स्वस्त कच्चं तेल(oil) खरेदी करता येतं. त्यामुळे देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. मात्र जर भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली, तर सौदी अरेबिया, अमेरिका किंवा इराण यांसारख्या देशांकडून आयात करावी लागेल. या देशांकडून तेल घेण्यामध्ये कोणतेही डिस्काउंट मिळत नाही.
याचा थेट परिणाम म्हणजे भारताला महाग कच्चं तेल विकत घ्यावं लागेल आणि त्याचा फटका थेट ग्राहकांना बसेल. अंदाजानुसार अशा परिस्थितीत देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 8 ते 12 रुपयांनी वाढू शकतात.
महागाईचा फटका, RBIचं विधान
अलीकडेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं होतं की, भारताने रशियाऐवजी इतर कोणत्याही देशाकडून तेल खरेदी केली तरी फारसा परिणाम होणार नाही. मात्र अर्थतज्ज्ञांच्या मते वास्तव वेगळं आहे. कारण, रशिया भारताला स्वस्तात तेल पुरवतो आणि ते इतर देशांकडून मिळणं अशक्य आहे.
जर रशियाकडून स्वस्त तेलाची सोय बंद झाली, तर इंधनदरांबरोबरच देशातील महागाईही वाढेल. वाहतूक, अन्नधान्य, वस्त्रोद्योग अशा अनेक क्षेत्रांमध्ये पेट्रोल-डिझेल हा मूलभूत खर्च असल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
‘WAR 2’चा जलवा! फक्त 5 दिवसांत 300 कोटींचा टप्पा गाठला
सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू