मुंबईवर सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा मारा सुरू असून शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे(Holiday).

शासकीय आणि खासगी कार्यालयांना सुट्टी :
महापालिकेने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांना आज मंगळवार (19 ऑगस्ट 2025) सुट्टी(Holiday) जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत. याशिवाय, खासगी कार्यालयांनाही आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षिततेसाठी घरात राहण्याचे आवाहन बीएमसीकडून करण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याने मुंबई शहर आणि उपनगरांसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू असून, पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आकाशात काळे ढग दाटून आल्याने शहरात अंधाराचे वातावरण आहे.
रेल्वे वाहतुकीवर परिणाम :
पावसाचा फटका मुंबईकरांच्या जीवनवाहिनी असलेल्या लोकल सेवेलाही बसला आहे. कारण मध्य रेल्वे मार्गावर घाटकोपर ते दादर दरम्यान रुळांवर पाणी साचल्याने गाड्या 25 ते 40 मिनिटं उशिराने धावत आहेत. तसेच हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनही सरासरी अर्धा तास उशिराने चालत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर सहसा कमी परिणाम होतो, परंतु यावेळी गाड्या 15 मिनिटं उशिराने धावत आहेत.
मुंबईत पावसाचा जोर लक्षात घेता महापालिकेने नागरिकांना इशारा दिला आहे की, गरज नसेल तर घराबाहेर पडू नये. नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी पालिकेचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा :
50 हजार कोटींच्या ‘लेटरबॉम्ब’ने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
5 स्टार हॉटेलमध्ये रुम बुक करून 40 वर्षीय महिलेवर आमदाराकडून लैंगिक अत्याचा
ग्राहकांसाठी आनंदसरी! खिशाचा भार कमी होणार; सोन्याचा आजचा भाव किती ?