बॉम्ब हिमवादळामुळे अमेरिकेतलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अमेरिकेच्या अनेक (bomb) राज्यांमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू असून, या बर्फवृष्टीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. सतत पडणाऱ्या बर्फामुळे रस्त्याचा अंदाज येत नसल्यानं अमेरिकेत रस्ते अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, या अपघातामध्ये देखील अनेकांचा बळी गेला आहे. अपघात होत असल्यानं सध्या अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये वाहतूक पूर्णपणे ठप्प असून, अनेक विमानांची उड्डाण देखील रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू असून, प्रवासी अडकून पडले आहेत. अचानक निर्माण झालेल्या या संकटामुळे तेथील प्रशासनावर सध्या मोठा ताण आला आहे.

गेल्या शंभर वर्षांमध्ये जेवढी बर्फवृष्टी झाली नव्हती, तेवढी बर्फवृष्टी अमेरिकेत (bomb) आता सुरू असल्याचं पहायला मिळत आहे, या हिमवादाळामध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, दरम्यान सर्वसामान्यपणे अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये इतर राज्याच्या तुलनेत तापमान हे अधिक असतं. परंतु यावर्षी या हिमवादळाचा मोठा फटका हा फ्लोरिडाला देखील बसला आहे. फ्लोरिडामध्ये सरड्यांची संख्या ही अधिक आहे, या राज्यात विविध जातीचे आणि विविध गुणधर्म, रंग असलेले सरडे आढळून येतात, मात्र या बर्फाचा मोठा फटका हा या सरड्यांना बसला असून, ते सुन्न होऊन झाडावरून खाली पडत आहेत, झाडावरून खाली पडणाऱ्या सरड्यांची संख्या एवढी आहे की, या ठिकाणी आकाशातून सरड्यांचा पाऊस पडत आहे की काय? असा भास होत आहे.
फ्लोरिडामध्ये कधीही तापमान हे 0 अंश सेल्सिअसच्या खाली जात नाही, परंतु यावेळी (bomb) तीथे देखील, तापमान हे मायनसमध्ये आहे, फ्लोरिडामध्ये सर्वासामान्य तापमान हे 12 ते 23 डिग्रीपर्यंत असतं, मात्र यावेळी तेथील तापमान देखील 0 अंश सेल्सिअसच्या खाली पोहोचलं आहे, याचा सर्वात मोठा तडाखा हा तेथील जैवविविधतेला बसला असून, त्यामुळे येथील सरड्यांच्या प्रजाती थंडीमुळे सुन्न होऊन झाडावरून खाली कोसळत आहेत.
हे सुद्धा वाचा
‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये ‘महाभारत’ फेम अभिनेते साकारणार मिर्झा राजे जयसिंग
Sangli : महाराष्ट्र हादरला! लेकाच्या डोळ्यादेखत वडिलांना संपवलं, केली निर्घृण हत्या
‘वडापाव गर्ल’ला पतीनेच फसवलं? रडत-ओरडत गंभीर आरोप; हाय-व्होल्टेज ड्रामा पाहून नेटकरी चक्रावले