महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट (rains)पुन्हा एकदा गडद झाले असून राज्यातील अनेक भागांमध्ये वातावरण ढगाळ झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत राज्यात जोरदार पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

उभ्या पिकांना या अवकाळी (rains)पावसाचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाऱ्याचा वेगही मोठा राहणार असल्याने झाडे पडणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा घटनांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः नाशिक, पुणे, औरंगाबाद, (rains)नागपूर आणि अमरावती या भागांमध्ये अतिवृष्टीचा धोका अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, प्रशासनानेही परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती तयारी सुरू केली आहे. आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क ठेवण्यात आली असून नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा :
6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! अदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज